You are currently viewing स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर कचरा टाकल्याने बांदा ग्रामस्थ आक्रमक…

स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर कचरा टाकल्याने बांदा ग्रामस्थ आक्रमक…

स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर कचरा टाकल्याने बांदा ग्रामस्थ आक्रमक…

उपसरपंचासह प्रशासन धारेवर; दोन दिवसात प्रश्न सोडवू,आबा धारगळकरांचे आश्वासन

बांदा

स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरच शहरातील कचरा टाकण्यात आल्याने शहरातील सर्वपक्षियांनी उपसरपंच आबा धारगळकर यांच्यासह ग्रामपंचायत प्रशासनाला धारेवर धरले. जोपर्यंत कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येत नाही तोपर्यंत कचरा याठिकाणी टाकू नये, अन्यथा तो ग्रामपंचायत कार्यालयासमोर कचरा जमा करावा, अशा सूचना ग्रामस्थांनी दिल्या.

यावेळी उपसरपंच धारगळकर यांनी दोन दिवसात कचरा उचलण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले. बांदा स्मशानभूमी परिसरात शहरातील दररोज गोळा होणारा कचरा टाकण्यात येतो. मात्र कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावण्यात न आल्याने हा कचरा मुख्य रस्त्यापर्यंत टाकण्यात आला आहे. कचऱ्याचे ढीग मुख्य रस्त्यावरच साठल्याने याठिकाणी अंतिम संस्काराचे क्रियाकर्म जाण्याची वाटही बंद झाली आहे. याची माहिती मिळताच ठाकरे शिवसेनेसह सर्वपक्षीय कार्यकर्ते आक्रमक झालेत. आज सकाळीच ठाकरे शिवसेनेचे विभागप्रमुख ज्ञानेश्वर येडवे, सुशांत पांगम, ओंकार नाडकर्णी, मनसे तालुकाप्रमुख मिलिंद सावंत, भाऊ वाळके, प्रशांत पांगम, राजेश. विरनोडकर, प्रशांत कोचरेकर, निखिल मयेकर, पांडुरंग नाटेकर, सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद काणेकर, पनो येडवे, राकेश केसरकर यांनी घटनास्थळी येत ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध केला. याठिकाणी पाहणीसाठी आलेले उपसरपंच आबा धारगळकर व भाजपा बांदा शहर अध्यक्ष बाबा काणेकर यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

प्रतिक्रिया व्यक्त करा