*सिंधुदुर्ग बदलणार राजकीय समीकरणे ……*
सिंधुदुर्ग:
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. ग्रामपंचायती ह्या सोयत्त संस्था असतात. स्थानिक लोकांनीच त्या लढवायच्या असतात. यापूर्वी गाव विकास पॅनलच्या माध्यमातूनच निवडणूका लढविल्या जात होत्या. यावेळी मात्र केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने स्थानिक नेत्यांच्या माध्यमातून विशेष म्हणजे भाजपचे राज्यस्तरीय नेतेही दाखल झाले होते, त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूका राजकीय दृष्ट्या अतिशय प्रतिष्ठेच्या बनल्या होत्या. भाजप विरोधात महा विकास आघाडी असे चित्र पहायला मिळाले.
भाजपने धुव्वा उडवत आपले वर्चस्व मिळविले. सेनेच्या ग्रामपंचायती काबीज केल्या या रणधुमाळीत काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षांचा धुव्वा उडाला. राष्ट्रवादीला खातेही खोलता न आल्याने राष्ट्रवादीच्या या जिल्हाध्यक्षांना आपल्या संघटनात्मक कामकाजाचे आत्मपरीक्षण करावे लागणार आहे, तर पक्षसंघटना वाढीसाठी पायाला भिंगरी लावल्यागत जिल्ह्यात फिरणाऱ्या काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांना तालुका अध्यक्ष यांच्या कार्यपद्धतीवर लक्ष द्यावा लागणार आहे.
-संवाद मीडियासाठी चेतन परब. (सिंधुदुर्ग)