*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*माझं बाळ*
बाळ माझं जन्मा आलं
घरी पाळणा सजला
आता नाही काही उणे
जन्म सार्थकी लागला **
माझा सोनुला, छकुला
कसा दुडु दुडु धावे
मनी काय असे भाव
त्याचे तयालाचं ठावे **
रूपं साजीर गोजिरं
पायी वाजती पैंजण
बघता बाळाच्या लीला
मज आकाश ठेंगणं **
अंगाई गीत गाऊन
निजविते बाळ राजा
कसं शांत झोपी गेला
गोड तान्हुला गं माझा **
दृष्ट लागु नये कोण्या
एका सटवीची बाळा
लिंबलोण उतरते
झाल्या की गं सांजवेळा **
दिर्घ आयुष्य लागु दे
काळजाच्या तुकड्यला
प्रार्थना करीते नित्य
पंढरीच्या विठोबाला **
*शीला पाटील. चांदवड.*