*”सर्वांचे प्रेम हेच जीवनाचे संचित!” – डॉ. श्रीपाल सबनीस*
*अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विशेष सत्कार संपन्न*
पिंपरी
“सर्वांचे प्रेम हेच माझ्या जीवनाचे संचित आहे!” असे कृतार्थ उद्गार ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी संत तुकारामनगर, पिंपरी येथे बुधवार, दिनांक १५ जानेवारी २०२५ रोजी काढले.
सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने आयोजित केलेल्या डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विशेष सत्कार सोहळ्यात ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले यांनी डॉ. सबनीस यांच्याशी मुलाखतीच्या माध्यमातून मुक्तसंवाद साधला. त्यापूर्वी, संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. शिवाजीराव मोहिते यांच्या अध्यक्षतेखालील आणि महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांच्या हस्ते डाॅ. श्रीपाल सबनीस यांचा सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ आणि ग्रंथ प्रदान करून विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाचे संस्थापक – अध्यक्ष जगन्नाथ नेरकर आणि कलारंजन प्रतिष्ठान, नवी सांगवीचे अध्यक्ष श्रीकांत चौगुले यांची व्यासपीठावर तसेच बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती, राजमाता अहिल्यादेवी शिक्षण संस्थेचे संस्थापक व्यंकटेश वाघमोडे, ललिता सबनीस, कामगारनेते अरुण गराडे, प्रा. बी. आर. माडगूळकर, पंकज पाटील, सुभाष चव्हाण, आत्माराम हारे आणि स्पर्धा परीक्षांचे अभ्यासक विद्यार्थी यांची सभागृहात उपस्थिती होती.
पुरुषोत्तम सदाफुले यांनी मनोगतातून, “आयुष्यभर माणसे जोडण्याचे काम डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले!” असे विचार मांडले; तर डॉ. शिवाजीराव मोहिते यांनी अध्यक्षीय मनोगतातून, “व्यासपीठावरून मांडलेले विचार आपल्या आचरणात आणून विचारांचे मूल्य आणि गांभीर्य डॉ. सबनीस यांनी नेहमी जोपासले आहे!” असे गौरवोद्गार काढले.
प्रकट मुलाखतीच्या माध्यमातून श्रीकांत चौगुले यांच्या मार्मिक प्रश्नांना डॉ. सबनीस यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली अन् त्यातून त्यांचा जीवनपट उलगडत गेला. घरची ११० एकर शेती, गढीसारखा वाडा, जमीनदार वडिलांचा लाभलेला सरंजामशाही वारसा, किशोरावस्थेत भजन – कीर्तनाची लागलेली गोडी, ऐन तारुण्यात मार्क्सवादाच्या आकर्षणातून रचलेली क्रांतीची गीते अन् त्यामुळे एका प्रसंगी ‘नक्षलवादी’ असा झालेला उल्लेख हे कथन करीत सबनीस पुढे म्हणाले की, प्रबंधलेखन (पीएच. डी.) करताना आंबेडकरवादाचा सखोल अभ्यास केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अभिप्रेत असलेल्या हिंदुवादाचा अभ्यास केला. केवळ हिंदुधर्मातीलच नव्हे तर बौद्ध, मुस्लीम, ख्रिश्चन, जैन अशा विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास केला. सर्व धर्मातील मूल्ये उच्च प्रतीची आहेत; पण सर्वांमध्ये अनिष्ट प्रथा आहेत. त्याचबरोबर सर्व महापुरुष वंदनीय असले तरी कोणताही महापुरुष परिपूर्ण नाही. उजव्या विचारवंतांची वैचारिक भूमिका मान्य होण्यासारखी नसली तरी त्यांच्यातील कृतिशीलता महत्त्वाची वाटते; तर डाव्या विचारवंतांची वैचारिक निष्ठा आदरणीय वाटली तरी त्यांच्यातही काही दांभिक वाटले. पिंपरी येथे संपन्न झालेले ८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ‘न भुतो न भविष्यती’ असे होते.
आजतागायत ७६ ग्रंथांचे लेखन, ५०० हून अधिक प्रस्तावना, १६०० हून अधिक व्याख्याने यांमधून मी सत्याचा सातत्याने
पाठपुरावा करीत चांगल्या विचारांची गोळाबेरीज करण्याचा प्रयत्न करतो आहे. यामध्ये प्रारंभी टीका झाली तरी आता सर्वांकडून प्रेमाची, आपुलकीची अनुभूती मिळते आहे. प्रा. नरहर कुरुंदकर यांसारखे गुरू तसेच पत्नी ललिता सबनीस यांची साथ लाभली आहे, अशी कृतज्ञताही त्यांनी व्यक्त केली. तसेच संमेलन पूर्वकाळातील वक्तव्य त्यातून निर्माण झालेले वादंग यावरही परखड भाष्य केले. याचबरोबर ललित लेखनातून वैचारिकणलेखनापर्यंतचा प्रवास उलगडताना काही किस्से व आठवणी त्यांनी जागवल्या.
जगन्नाथ नेरकर यांनी प्रास्ताविक केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. शिरीष पडवळ यांनी आभार मानले.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
______________________________
*संवाद मीडिया*
*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.)
*वारस होऊ सैनिकी परंपरेचे…*
काळानुरूप जलदगतीने बदलत जाणाऱ्या शैक्षणिक गरजा, विज्ञान व माहिती तंत्रज्ञानाच्या
युगात, वाढत्या स्पर्धात्मक जीवनात जिद्दीने आणि महत्वाकांक्षी वृत्तीने यशस्वी होणारे विद्यार्थी
निर्माण करण्याचे पवित्र आणि प्रामाणिक ध्येयरूपी कार्य सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट एक्स सर्व्हिसमेन
असोसिएशन संचलित शासनमान्य सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली गेली 21 वर्षे अविरतपणे करित आहे.
*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.)
*🏆An Award Winning School🏆*
महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..
Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
💁♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
👉शैक्षणिक वर्ष 2025 – 26 करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ६ वी च्या वर्गासाठी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु
*✨आमची वैशिष्ट्ये✨*
➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division
📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
https://forms.gle/vPE7oVGpsLmEUMw68
*www.sindhudurgsainikschool.com*
वरील लिंकवर ऑनलाईन नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.
*💁♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*
*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*जाहिरात
————————————————
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*