निगडी परिसरातील शिवभूमी विद्यालयाचे संस्कार स्पर्धेतील यशामुळे उपक्रमशिल शिक्षिका, कवयित्री कोठेकर योगिता सन्मानित
पिंपरी
पिंपरी चिंचवड परिसरात जानेवारी महिन्यात राबवली जाणारी संस्कार जत्रा यांचे सर्वेसर्वा मा .श्री मोहन गायकवाड नेहमीच विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ मिळवून देत असतात त्या कार्यक्रमांतर्गत विविध स्पर्धा इथे घेतल्या जातात आणि या स्पर्धेत निगडी परिसरातील शिवभूमी विद्यालयातील विद्यार्थी भाग घेत असतात यावर्षीही पुष्कळ मुलांनी प्रत्येक स्पर्धेत सहभाग घेऊन शाळेला बक्षीस प्राप्त केले . जानेवारीत झालेल्या विविध स्पर्धांपैकी चित्ररंगभरण , मॅथ मस्ती आणि हस्ताक्षर स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या कला गुणांनी भरघोस यश मिळवले .यातील वैयक्तिक नृत्य मध्ये सई जोशी ( इ.१ली )हिने दुसरा क्रमांक मिळवला .तर श्रीमद्भगवद्गीता बारावा श्लोक म्हणून आरती यादव हिने प्रथम क्रमांक पटकावला . वक्तृत्व स्पर्धेत इशिता फडतरे (इ २री) हिने तृतीय क्रमांक मिळवला.तसेच वेशभूषा स्पर्धेत काव्या पाटोळे (१ली ) हिने दुसरा क्रमांक मिळवला तर श्लोक तिकोडे (१ली )व इ २ री तील देशमूख सारंग या दोघांनी उत्तेजनार्थ बक्षीस मिळवले .
रांगोळी स्पर्धेत सुंदर रांगोळी काढून इ ६वीतील विस्वजा जाधव हिने दुसरा क्रमांक पटकवला आणि समूहनृत्य स्पर्धेमध्ये गणेशगीत या गाण्यावर नृत्य करून इ १ली २री च्या गटातून प्रथम क्रमांकाचे बक्षीस शाळेला मिळाले .वरील सर्व स्पर्धेत शाळेच्या मा .मुख्याध्यापिका सौ अश्विनी पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले . त्या शाळेतील उपक्रमशील तंत्रशिक्षिका लेखिका कवयित्री कोठेकर मॅडम या दरवर्षी विद्यार्थ्यांना बाह्य स्पर्धेत भाग घेण्यास प्रोत्साहित करत असतात . विद्याथ्वीच्या सर्वांगिण विकासासाठी त्या नेहमी नवनविन प्रयोग करीत असतात . त्यासाठी त्या स्वतः विद्यार्थ्यांचे पाठांतर घेतात त्यांना मार्गदर्शन करतात . स्पर्धेला घेऊन जातात आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतात त्यामुळे विद्यार्थ्यामध्ये स्पर्धेत सहभाग घेण्याची आवड निर्माण होते . पालक व विद्यार्थी त्यांना सहकार्य करीत असतात . यावर्षी त्यांच्या कष्टाचे चीज होण्यासाठी संस्कार जत्रेचे आयोजक मा श्री गायकवाड सरांनी साऊथचे सिने कलाकार देवसिंह गिल, महापालिका आयुक्त मा .शेखर सिंग व पोलिस आयुक्त यांच्या उपस्थित सन्मानचिन्ह व पुष्प देऊन सन्मानित केले . शाळेच्या प्रमुखांमुळे हे सर्व शक्य होत असते असे त्यांचे मत आहे . त्यामुळे उपक्रमशील शिक्षिका कवयित्री कोठेकर योगिता यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे व पुढील वर्षी जास्तीत जास्त विद्यार्थी आपले कला गुण सादर करतील अशी खात्री पालकांनाही वाटत आहे नक्कीच यातून उद्याचे कलाकार निर्माण होतील यात शंका नाही
______________________________
*संवाद मिडिया*
प्रिय पालक आणि विद्यार्थी,
आपल्या रत्नागिरीत पहिल्यांदाच फक्त *JEE आणि CET* परीक्षांच्या उत्कृष्ट तयारीसाठी सुवर्णसंधी!
*आता कोकणातील एकमेव IITian शिक्षक म्हणजेच राजवाडे सरांच्या च्या मार्गदर्शनाखाली विशेष बॅच सुरू होत आहे.*
✅ तज्ज्ञ मार्गदर्शन: IIT JEE / CETचे अनुभव आणि यशस्वी तंत्रशुद्ध अभ्यास पद्धती
✅ व्यक्तिगत लक्ष: प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीवर विशेष भर
✅ नवीनतम अभ्यासक्रम: JEE आणि CET साठी अद्ययावत नोट्स आणि टेस्ट सिरीज
✅ आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर: सुलभतेने शिकण्यासाठी डिजिटल साधने
आता आपल्या मुलाचे स्वप्न IIT किंवा उत्कृष्ट अभियांत्रिकी कॉलेजमध्ये जाण्याचे पूर्ण करा!
स्थाने आणि नोंदणीसाठी आजच संपर्क साधा:
📞 9653348536 / 9421141980
📍 [यश सिद्धी क्लास, शिर्के प्लाझा]
शिकण्याचा नवीन दृष्टीकोन आणि प्रेरणादायक वातावरणाची हमी!
सीमित प्रवेश – आजच नोंदणी करा!
“यश तुमच्या मुलाच्या भविष्याचा पाया होईल!”
*Advt
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*