You are currently viewing वेंगुर्ला पाटकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पन्नास वर्षांनंतर पुनःभेटीचा अलिकडेच जुळवून आणला योग 

वेंगुर्ला पाटकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पन्नास वर्षांनंतर पुनःभेटीचा अलिकडेच जुळवून आणला योग

सिंधुदुर्ग :

शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकाची आयुष्यात आपल्या पायावर उभे राहण्यासाठी धडपड सुरू असते. याला कोणी अपवाद नसावे. दरम्यान शिक्षण घेत असतानाच्या आठवणी मनात रुंजी घालतात. त्यातून आपल्यासोबत त्यावेळी कोणकोण मित्र मैत्रिणी होत्या यांचा शोध घेण्याचे ठरले. यात भ्रमणध्वनीची मदत मोलाची ठरली. वेंगुर्ला तालुक्यातील आर. के.पाटकर हायस्कूल एस एस सी १९७४- ७५ ह्या वर्गातील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी वेंगुर्ला सागरी किनाऱ्यावर एकत्र येण्याचे निश्चित केले. तब्बल ५० वर्षानंतर या पुन्हा एकदा स्नेहसंमेलनाचा योग्य जुळून आला. इतक्या वर्षांनी वर्गातील सखे, सखी एकमेकांना भेटणार यांचे औत्सुक्य प्रत्येकाच्या ठायी ठायी दिसून येते होते. अर्थात कोणीतरी यांचे नेतृत्व करावे यासाठी दिलीप गिरप, किरण पिंगुळकर, विनोद मांजरेकर, प्रकाश पावसकर, उज्ज्वला खोत -हिंदळेकर, सुमती राऊळ – चोपडेकर यांनी संवाद साधला. आज यापैकी बरेच जण उच्च पदस्थ बँक अधिकारी म्हणून सेवा निवृत्त झाले. त्यात एकमेव सुमती राऊळ चोपडेकर यांनी अध्यापन आणि अध्ययन कार्य करताना माध्यमिक शिक्षणातून शिक्षकांनी जे मार्गदर्शन केले त्यांचा फायदा माझ्या वैयक्तिक जीवनात झाला हे सूचित करताना आठवणींना उजाळा दिला. आज सर्वजण आजोबा आजी झाल्याचे प्रत्येकाच्या मुखी होते. तथापि काही जण आपल्यात नाहीत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पुढील काळात असेच समन्वयाने पुन्हा एकदा भेटूया असा शब्द देत निरोप घेतला.

प्रतिक्रिया व्यक्त करा