You are currently viewing वेत्ये येथे श्रमदानातून वनराई बंधारा

वेत्ये येथे श्रमदानातून वनराई बंधारा

वेत्ये येथे श्रमदानातून वनराई बंधारा

सरपंच गुणाजी गावडे, माजी सरपंच सुनील गावडे यांच्या संकल्पनेतून बंधारा*

सावंतवाडी

वेत्ये ग्रामपंचायत सरपंच गुणाजी गावडे, माजी सरपंच तथा माजगाव विभागप्रमुख सुनील गावडे यांच्या संकल्पनेतून “पाणी अडवा पाणी जिरवा” या योजनेंतर्गत वेत्ये रस्तावाडी कॉजवेच्या जवळ श्रमदानाने वनराई बंधारा बांधण्यात आला.

या श्रमदान कार्यात शिवसेना (ठाकरे गट) शाखाप्रमुख सुरेश सातार्डेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष गावडे, संदीप गावडे, लवू गावडे, समीर गावडे, अभिमन्यू गावडे, सचिन गावडे, विश्वास गावडे, राजन वाडयेकर यांनी सहभाग घेत श्रमदान केले. तसेच सदरच्या उपक्रमासाठी जितेंद्र गावकर यांचेही सहकार्य लाभले. या राबविलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा