मालवण पत्रकार समितीच्या पुरस्कारांचे आज वितरण…
मालवण
मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पत्रकार पुरस्कार तसेच मालवणरत्न व कलारत्न या विशेष पुरस्कारांचा वितरण सोहळा आज १८ जानेवारी रोजी कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालय येथे होणार आहे अशी माहिती पत्रकार समिती अध्यक्ष संतोष गावडे यांनी दिली.
जाहीर झालेल्या पुरस्कारांमध्ये कै. नरेंद्र परब स्मृती पुरस्कार पत्रकार संग्राम कासले, कै. भाईसाहेब खांडाळेकर स्मृती पुरस्कार पत्रकार केशव (भाऊ) भोगले, पत्रकार समिती व पत्रकार अमित खोत पुरस्कृत ‘बेस्ट स्टोरी अवार्ड’ हा विशेष पुरस्कार पत्रकार झुंजार पेडणेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. यांच्यासह पत्रकार सुरेश ठाकुर व नितीन आचरेकर यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
यावर्षी मालवणरत्न हा पुरस्कार सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असणाऱ्या १०० इडीयट या ग्रुपला देऊन सन्मानित केले जाणार आहे. तर कलारत्न या पुरस्काराने साई पारकर यांचा सन्मान होणार आहे. सर्व पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.