*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा साहित्य प्रेरणा कट्टा आजगावच्या सन्मा. सदस्या लेखिका कवयित्री सौ स्नेहा धोंडू नारिंगणेकर लिखित अप्रतिम द्विपदी काव्यरचना*
*शीर्षक – संजीवनी*
ही जन्माची गाठ नियतीने बांधली
उत्तरत्या उन्हाची लांब ती सावली
नाते शतजन्मीचे ओळखीचे वाटले
श्वास दोघांचे स्पर्शविनाही गुंतले
जाणीवांचा पूल भावनांनी सांधला
स्वप्नांचा त्यावर मनोरमा बांधला
संध्येची मेहंदी नव्याने रंगली
मावळत्या सूर्याच्या सेवेत दंगली
दरवळला रातराणीचा बहर
मी तू पणाचे एक झाले सारे प्रहर
एकदेही बंध जुळले ज्या क्षणी
लाजऱ्या प्रभेला लाभली संजीवनी
सौ. स्नेहा धोंडू नारिंगणेकर
शिरोडा सिंधुदुर्ग
७०६६९९८७९६

