जिल्हास्तरीय समन्वय समितीची स्थापना
सिंधुदुर्गनगरी
केंद्र शासनातर्फे राष्ट्रव्यापी आठवी आर्थिक गणना घेण्यात येणार आहे. शासन निर्णयानुसार सन 2025-26 मध्ये घेण्यात येणाऱ्या आठवी आर्थिक गणनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व कामाच्या सनियंत्रण व समन्वयासाठी या आदेशान्वये जिल्ह्याकरीता खालीलप्रमाणे जिल्हास्तरीय समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा प्रभारी अधिकारी, आर्थिक गणना अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सह अध्यक्ष, जिल्हा नियोजन अधिकारी सदस्य, जिल्हा सह आयुक्त/ सहायक आयुक्त नगरपालिका प्रशासन सदस्य, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (क्षेत्रिय कार्य विभाग) सदस्य, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र सदस्य, जिल्हा माहिती अधिकारी सदस्य, राष्ट्रीय विज्ञान व सूचना अधिकारी (NIC) सदस्य, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सदस्य, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, माध्यमिक जि.प./ महानगरपालिका सदस्य, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग सदस्य, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सदस्य, सहायक आयुक्त (कामगार) सदस्य, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बालकल्याण सदस्य, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नोडल अधिकारी) सदस्य, जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा शल्यचिकित्सक सदस्य, मुख्याधिकारी नगरपालीका/ नगरिषद / नगरपंचायत (सर्व ) सदस्य, उपसंचालक, जिल्हा सांख्यिकी कार्यालय तथा जिल्हा नोडल अधिकारी सदस्य सचिव.
जिल्हास्तरीय समन्वय समितीची कार्यकक्षा पुढीलप्रमाणे:- आर्थिक गणनेचे नियोजन व पूर्वतयारी करणे. आर्थिक गणनेची उदिष्टे, व्याप्ती आणि कार्यपध्दती यांचा आढावा घेणे. गणनेचे क्षेत्रकामासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करुन देणेसाठी आराखडा तयार करणे. विविधस्तरावरील प्रशिक्षण व क्षमता बांधणी करणे. आर्थिक गणने दरम्यान जिल्हास्तरीय यंत्रणांशी समन्वय राखणे व आवश्यक निर्देश देणे. प्रगणक, पर्यवेक्षक यांच्य नियुक्त्या निश्चित करणे. क्षेत्रकामाचे सनियंत्रण करणे. आर्थिक गणनेची जनजागृती व प्रसिध्दी करणे. गणनेचे सर्व भागधारक जिल्हा, तालुका, नागरी, ग्रामीण पातळीवरील स्थानिक स्वराज्य संस्थांचे संबंधित अधिकारी प्रगणक व पयवेक्षक यांच्यापर्यंत माहिती आणि मार्गदर्शक सूचनांचा प्रसार सुनिश्चित करणे. माहितीचे प्राथमिक वैधतीकरण करणे. याबाबत तालुकास्तरीय समितीस मार्गदर्शन करणे व आवश्यक निर्देश देणे. आर्थिक गणनेच्या कामात जिल्हा स्तरीय समन्वय समिती सदस्य सचिव यांना आवश्यक सर्व सहकार्य करणे.
०००००००