You are currently viewing क्रीडा सप्ताहनिर्मित वेगवेगळ्या शाळेत विविध क्रींडा उपक्रम संपन्न

क्रीडा सप्ताहनिर्मित वेगवेगळ्या शाळेत विविध क्रींडा उपक्रम संपन्न

क्रीडा सप्ताहनिर्मित वेगवेगळ्या शाळेत विविध क्रींडा उपक्रम संपन्न

सिंधुदुर्गनगरी

राज्यातील नवोदित खेळाडूंमध्ये खेळाविषयाची गोडी निर्माण व्हावी तसेच खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने दरवर्षी राज्यस्तरावर क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात होते. त्याअनुषंगाने  दि 12 ते 18 डिसेंबर 2024 रोजी क्रीडा सप्ताहा निमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेगवेगळ्या शाळेत विविध क्रीडा उपक्रम यशस्वी पणे संपन्न झाले. कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डे याठिकाणी क्रीडा जनजागृती रॅली, व्हॉलीबॉल स्पर्धा, रस्सीखेच स्पर्धा, लगोरी स्पर्धा, लंगडी स्पर्धा, कॅरम स्पर्धा, आट्यापाट्या स्पर्धा संपन्न झाल्या.

तसेच एस. व्ही.एम अॅन्ड ज्यूनिअर कॉलेज-सायन्स कुडासे याठिकाणी कबड्डी स्पर्धा, धावणे स्पर्धा, लांब उडी, गोळा फेक, क्रिकेट, व्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न झाल्या. मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी याठीकाणी लंगडी स्पर्धा, फुटबॉल स्पर्धा तसेच व्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न झाल्या. क्रीडा सप्ताह निमित्त वाडा हायस्कूल देवगड याठिकाणी खो-खो क्रीडा स्पर्धा, कबड्डी स्पर्धा, धावणे स्पर्धा तसेच व्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न झाल्या. सिंधुदुर्ग सैनिक पब्लिक स्कुल, आंबोली याठिकाणी क्रीडा सप्ताह निमित्त हॉकी स्पर्धा, फुटबॉल स्पर्धा, व्हॉलीबॉल स्पर्धा, गोळाफेक स्पर्धा, कबड्डी स्पर्धा संपन्न झाल्या. या क्रीडा सप्ताहाच्या निमित्ताने जिल्ह्यातील वेगवेगळ्या शाळेंनी आयोजित केलेल्या वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धेत मोठ्या संख्येने खेळाडू विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

प्रतिक्रिया व्यक्त करा