You are currently viewing एम.आय.टी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी अभिषेक सिंग ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या पी. एचडीने सन्मानित

एम.आय.टी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी अभिषेक सिंग ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या पी. एचडीने सन्मानित

एम.आय.टी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी अभिषेक सिंग ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या पी. एचडीने सन्मानित

मालवण

जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट सुकळवाड येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या महाविद्यालयात बी.ई. कॉम्प्युटर शाखेचा माजी विद्यार्थी श्री. अभिषेक शिवप्रकाश सिंग या विद्यार्थ्याने सर्वात कमी वयात सायबर सिक्युरिटी वर पुस्तक लिहून विश्वविक्रम केला होता. हे लिहिलेले पुस्तक अॅमेझॉन प्लॅटफॉर्मवर भारतासह अमेरिका, फ्रान्स, इसाइल, जपान, युके सह 26 देशात विक्रीसाठी उपलब्ध असून अॅमेझॉन बेस्ट सेलर कॉम्प्युटर बुक म्हणून 1750 क्रमांक या पुस्तकाने मिळवला आहे. त्याच्या या नेत्रदीपक कामगिरीबद्दल माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यभवनामध्ये निमंत्रित करून त्याचा विशेष सत्कार केला. त्यावेळी अभिषेकने स्वतः लिहिलेले पुस्तक राज्यपालांना भेट दिले. अभिषेक याने सायबर क्राईमला आळा घालण्यासाठी कोणत्या उपाययोजना आखता येतील यावर आधारित वेब हँकिंग 101: बुक फॉर व्हाईट हॅट हॅकर हे पुस्तक लिहिले आहे. अभिषेक याने एम.आय.टी.एम. अभियांत्रिकी कॉलेज सुकळवाड येथे बी.ई. पर्यंतचे कॉम्प्युटर विषयाचे शिक्षण घेतले असून मास्टर इन सायबर सिक्युरिटी अभ्यासासाठी युके मधील केंब्रिज युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश घेतला आहे. अभिषेक याचे सायबर सिक्युरिटी मधील अगावू ज्ञान आणि कौशल्य सायबर सिक्युरिटी मधील प्रोजेक्टमध्ये देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या कामगिरीमुळे ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्याच्या कामाची दखल घेत सायबर सुरक्षा विषयात अभिषेक सिंगला मानद पी.एच डी बहार केली. फार कमी वयात अभिषेकने यशाचे शिखर गाठले आहे. त्याची ही उपलब्धी खरोखर वाखाणण्याजोगी आहे. त्याच्या या नेत्र दीपक कामगिरीबद्दल एमआयटीएम अभियांत्रिकी कॉलेज सुकळवाड येथील संस्थेचे अध्यक्ष संतोष पाल, उपाध्यक्ष विनोद कदम, सेक्रेटरी नेहा पाल, खजिनदार वृषाली कदम, विश्वस्त केतन कदम, कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. ढणाल, उपप्राचार्य सौ पुनम कदम, उप प्राचार्य श्री विशाल कुशे यांच्यासह संस्थाचालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिषेकचे अभिनंदन केले व त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

*संवाद मीडिया*

*हमखास रिजल्ट देणारा ब्रँड म्हणजेच…_*

*🚒🚒 एस एस बोअरवेल 🚒🚒*

*🏟️बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव*🏟️

👉 *_विश्वसनीय सेवेची हमी म्हणजे एस एस बोअरवेल_*

_20 वर्षांहून जास्त सेवेचा अनुभव._

👉 *_संपूर्ण सिंधुदुर्गात कोठेही आणि कधीही आपल्या सेवेसाठी उपलब्ध…._*

_4.5″ /6″ /6.5 “/7” /9″/इंच बोअरवेल योग्य दरात खोदून मिळतील._

👉 _*अडचणीच्या ठिकाणी लांब 200 फुटापर्यंत बोअरवेल खोदून मिळेल.*_

_आर्थिन होल खोदून मिळतील.._

👉 *नामांकित कंपनीचे पंप सेट गॅरंटी सहित फिटिंग करून मिळतील.*

*अडकलेले पंप काढून मिळतील.पंप रिपेरिंग करून मिळतील.*

*🚒🚒 एस एस बोअरवेल. 🚒🚒*

👉 *प्रो. प्रा. समीर पाटील.*

*आमचा पत्ता :-*👇

*एस एस बोअरवेल*
*जाणवली, मुंबई गोवा हायवे लगत, जागृत मोटर्स समोर.*

*एस एस बोअरवेल आणि इलेक्ट्रिक वर्क्स, आचरा रोड, मारुती आळी, लक्ष्मी चित्रमंदिर नजीक, डॉ राणे हॉस्पिटल बाजूला.*

*आजचं संपर्क करा*
📞 *9421237130*
📞 *9422999594*
📞 *9011630901*
📞 *9284329683*
📞 *9420261271*
📞 *7666128596*
📞 *9011630901*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121457/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा