You are currently viewing आरटीई 25 टक्के अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन

आरटीई 25 टक्के अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन

आरटीई 25 टक्के अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

शैक्षणिक वर्ष सन 2025-26 वर्षाची आरटीई 25 टक्के प्रवेश प्रकिया  ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील 48 शाळा मधून 268 जागांसाठी  दिनांक 14  ते  27 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये पालकांना बालकांच्या प्रवेशाकरीता ऑनलाईन अर्ज भरण्याकरीता प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे. प्रवेश अर्ज Rte portal Maharashtra च्या https://student.maharashtra.gov.in/adm_portal  या वेबसाईटवर भरावेत, असे आवहान जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी यांनी  केले आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना आरटीई 25 टक्के प्रवेशाच्या अनुषंगाने प्राधान्यक्रम ठरविताना विदयार्थ्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटरपर्यतच्या अंतरावर स्वंय अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळा, पोलिस कल्याणकारी शाळा (विनाअनुदानित) आणि महानगरपालिका शाळा (स्वंय अर्थसहाय्यित शाळा) अशा सर्व शाळा असतील. वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना 25 टक्के प्रवेशाअंतर्गत प्रवेशासाठी पुढीलप्रमाणे शाळा व्यवस्थापनाच्या स्वंयअर्थ सहाय्यित शाळा, खाजगी विनाअनुदानित (अंशत: अनुदानित शाळा वगळून), पोलीलस कल्याणकारी शाळा (विनाअनुदानित), महानगरपालिका शाळा निश्चित करण्यात आल्या आहेत.

या प्रवेश प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी जिल्ह्यातील 8 तालुक्यात ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी मदतकेंद्र स्थापन करण्यात आलेली आहे. तसेच ऑनलाईन प्रवेश अर्जाची पडताळणी करण्याठी पडताळणी समिती प्रत्येक तालुक्यात गठीत करण्यात आलेली आहे.

आरटीई 25 टक्के प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे व इतर बाबी

निवासी पुरावा :- अ. रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज, टेलिफोन देयक, प्रॉपर्टी टॅक्स देयक, घरपट्टी आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक इ. यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरावा. बभाडेतत्वावर राहणाऱ्या पालकांकरीता भाडेकरार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृतच असावा. 11 महिन्यांचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला असावा, जे पालक भाडेकरार जोडतील त्यांची कोणत्याही टप्प्यावर पडताळणी करण्यात येईल. बालक / पालक जर त्या ठिकाणी रहात नसतील तर त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. व सदर बालकाचा प्रवेश रद्द करण्यात येईल तसेच संपूर्ण फी पालकाने भरावी लागेल. जन्मतारखेचा पुरावा, जात प्रमाणपत्र पुरावा (सक्षम अधिकाऱ्यांनी प्रमाणित करुन दिलेले जात प्रमाणपत्र असावे.)  उत्पनाचा दाखला (उत्पन्नाचा दाखला रु.1 लाखापेक्षा कमी उत्पन्न.) प्रवेश प्रक्रिया सुरु होणाऱ्या एक वर्षापूर्वीच्या आर्थिक वर्षातील असावा. उदा. सन 2025-26 मध्ये प्रवेश घेताना पालकांचे सन 2023-24 किंवा सन 2024-25 या वर्षातील उत्पन्नाचा दाखला प्रेवशाकरिता ग्राहय समजण्यात यावा. दिव्यांग मुलांसाठी वैद्यकिय प्रमाणपत्राचा पुरावा. जिल्हा शल्य चिकित्सक / वैद्यकिय अधिक्षक, अधिसुचित जिल्हा शासकिय रुग्णालय यांचे 40 टक्के पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र.

RTE Act 2029 नुसार सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरीता शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय 6+ गृहित धरताना मानीव दिनांक 31 डिसेंबर निश्चित करण्यात आलेली आहे. पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना single Parent (विधवा, घटस्फोटीत, आई अथवा वडील यापैकी कोणताही एक) पर्याय निवडला असेल तर संबंधित बालकाचे पालकत्व स्विकारलेल्या व्यक्तीचे प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र ग्राहय धरण्यात यावेत.

आरटीई नियमानुसार एखाद्या शिक्षण संस्थेच्या एकाच आवारात अथवा परिसरात इ.1 ली ते 4 थी पर्यंत मान्यता असलेली एक शाळा असेल व तेथेच इयत्ता 5 वी ते 10 वी पर्यंत मान्यता असलेली दुसरी शाळा असल्यास इलेमेंटरी सायकल नुसार इयत्ता 1 ली ला 25 टक्के प्रवेशप्रक्रिये अंतर्गत दिलेले प्रवेश पुढे त्याच संस्थेच्या त्याच परिसरातील (एका आवारातील) असलेल्या शाळेत इयत्ता 5 वी ते 8 वी करिता ते प्रवेश नियमित राहतील. तालुका पडताळणी समिती / शाळा विदयार्थ्यांने ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करताना वरील कागदपत्रांमधील 1 किंवा त्यापेक्षा जास्त पुरावे अवैध असल्यास त्या कारणांमुळे आरटीई प्रवेश नाकारु शकेल. पालकांनी केवळ SMS वर अवलंबून न राहता RTE Portal वर वेळोवळी दिलेल्या सुचनांचे अवलोकन करावे व सदरील माहितीचा लाभ घ्यावा. विहित मुदतीनंतर प्रवेशासाठी कोणत्याही पालकांच्या अर्जाची किंवा निवेदनाची दखल घेतली जाणार नाही याची सर्व पालकांनी गाभियाने नोंद घ्यावी.

प्रतिक्रिया व्यक्त करा