You are currently viewing जोगेश्वरीत रोजगार मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद 

जोगेश्वरीत रोजगार मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद 

मुंबई :

खासदार श्री रविंद्र वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योग व रोजगार विकास मंचचे अध्यक्ष शैलेश जायसवाल यांनी सौ. मनिषा वायकर यांच्या सहकार्याने दिनांक १५ जानेवारी, २०२५ रोजी जोगेश्वरी पूर्वेकडील श्यामनगर तलावाजवळ भव्य रोजगार मेळावा आयोजित केला होता.

या कार्यक्रमाला तब्बल ३८९६ नोकरी इच्छुक जणांची नोंदणी झाली होती. यापैकी १८४२ जणांच्या रोजगाराचे स्वप्न साकार झाले असून ५६४ जणांना पुढील तीन दिवसांत पुन्हा मुलाखतींच्या फेऱ्यांना सामोरे जाण्याची संधी मिळणार आहे. ४६३ जणांचे अर्ज पुढील मुलाखतीसाठी जमा केले आहेत.

या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन खासदार श्री. रविंद्र वायकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. श्री भाई मिर्लेकर यांनी विशेष मार्गदर्शन करून शिवसेना शिंदेगटाच्या जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. मिशन पत्रकारितेच्या सर्व सदस्यांनी सक्रिय सहकार्य केले.

या कार्यक्रमास विभाग प्रमुख श्री ज्ञानेश्वर सावंत, रचना सावंत आणि प्रियांका आंबोलकर तसेच सर्व शाखाप्रमुख आणि पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा