वेंगुर्ला तालुक्यामध्ये शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात महाआरोग्य शिबिर संपन्न
वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यामध्ये शिरोडा उपजिल्हा रुग्णालय येथे अथायु मल्टिस्पेशालिस्ट हाॅस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित महाआरोग्य शिबिराचा बुधवारी दिनांक 15/1/2025 रोजी शिरोडा उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डाॅ प्रवीण देसाई बालरोगतज्ञ यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने शुभारंभ संपन्न झाला*
*सिंधुदुर्ग जिल्हा वेंगुर्ला तालुक्यामध्ये शिरोडा उपजिल्हा रुग्णालय व अथायु मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर विमानतळ शेजारी हायवेवर यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिर शिरोडा उपजिल्हा रुग्णालयामध्ये भरवण्यात आले होते*.
*यावेळी शिरोडा उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर प्रवीण देसाई बालरोगतज्ञ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून तसेच डॉक्टर आकाश काटोळे बालरोगतज्ञ यांच्या हस्ते श्री फळ वाढवून या महा आरोग्य शिबिराचा शुभारंभ करण्या आला.*
*यावेळी या शुभारंभाच्याप्रसंगी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान चे अध्यक्ष सावंतवाडी श्री राजू मसुरकर तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे मेट्रॉन जानवी कुशे, डॉक्टर गणेश मर्डेकर ,अथायु मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल मार्केटिंग हेड श्री मदन गोरे, डॉक्टर सुदेश कुमार मुळीक, डॉक्टर रघुनाथ नाईक, अथायु मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे पीआरओ वैभव काटकर, विवेक चव्हाण तसेच किरण पाटील कॅम्प कोऑपरेटर रोहित कुरणे, गौरव आपटे आणि हॉस्पिटलचे सारथी संदीप चौगुले तसेच सामाजिक कार्यकर्ते संजय तानावडे ,बाळा बोंद्रे, ओमकार पडते वगैरे, शिरोडा गावातील नागरी रुग्ण ,रुग्णांचे नातेवाईक उपजिल्हा रुग्णालयाचे आरोग्य कर्मचारी ,परिचारिका या कार्यक्रमाला उपस्थित होत्या*
*यावेळी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजू मसुरकर यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की महाराष्ट्र मध्ये पहिल्याप्रथम 2012 व 2013 या काळामध्ये फक्त आठ जिल्ह्यांना राजीव गांधी जीवनदायी जन आरोग्य योजना म्हणून काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुरू केली होती.*
*36 जिल्ह्यांपैकी 28 जिल्ह्यांना ही जीवनदायी आरोग्य योजना न मिळाल्याने अनेक वेळा मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवून सुद्धा ही योजना मंजूर होत नव्हती*.
*2013 नोव्हेंबर पूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सावंतवाडी संस्थांच्या राजमाता श्रीमती सत्वशीला देवी राणी भोसले यांना खाजगी भेटीसाठी सावंतवाडीत आले असताना श्री राजेंद्र मसुरकर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन देऊन मागणी संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांना ही योजना मिळावी अशी मागणी केली होती*
*माझा सोन्या-चांदीचा व्यवसाय असून माझ्याकडे गोरगरीब माणसे अनेक मौल्यवान दागिने वेळप्रसंगी आपले मंगळसूत्र विकून खाजगीरित्या रुग्णालयामध्ये जाऊन आपली शस्त्रक्रिया करून घेत असतात वेळप्रसंगी आपले जमिनी विकून किंवा घाण ठेवून आपल्या रुग्णांचा गोरगरीब नागरिक आपल्या व्यक्तीचा इलाज करून घेत असतात. हे मी माझ्या डोळ्यांनी गोरगरिबांची अश्रू पाहून मला मिळणारा दागिने विकून फायदा न बघता गोरगरिबांना तुम्ही मुख्यमंत्री आहात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोरगरीब रुग्णांना याचा फायदा या योजनेचा मिळाला पाहिजे असे निवेदन देऊन मी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मागणी केली होती.*
*सावंतवाडी संस्थांचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व राजमाता राणी सत्वशीला देवी भोसले यांचे नातेसंबंध असल्यामुळे एक महिन्यांमध्ये संपूर्ण महाराष्ट्राला व संपूर्ण जिल्ह्यांना ही राजीव गांधी जीवनदायी जन आरोग्य योजना म्हणून माझ्या निवेदनानुसार मंजूर करण्यात आली.*
*त्यानंतर आठ वर्षांपूर्वी ही योजना गोवा बांबुळी इथे मंजूर नसल्याने व दोडामार्ग तालुक्यामध्ये ग्रामस्थांचं जन आक्रोश आंदोलन झाले होते. त्या आंदोलनाला मसूरकर यांनी भेट दिल्यानंतर गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या सावंतवाडीच्या राजघराण्यांचे नातेसंबंध असल्यामुळे ही योजना मंजूर व्हावी म्हणून मसूरकर यांनी प्रयत्न करून त्यावेळी मोबाईल वरती बोलून ही महात्मा फुले जीवनदायी जन आरोग्य योजना गोवा बांबुळी येथे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी मंजूर करण्यात आली.*
*त्यामुळे राजघराण्याच्या नातेसंबंधामुळे दोन्ही महाराष्ट्रामध्ये तसेच गोवा बांबुळी येथे ठिकाणी सदरील योजना मंजूर करण्यात आली. यामुळे माझ्या सारख्या आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला गोरगरिबांना न्याय मिळाला.*
*त्याचप्रमाणे गोरगरिबांचे आशिर्वाद भाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळालं असे भावपूर्ण उदगार श्री राजू मसूरकर यांनी या महा आरोग्य शिबिराला मार्गदर्शन त्यावेळी काढण्यात आले*
*तसेच यानंतर शिरोडा उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर प्रवीण देसाई बालरोगतज्ञ यांनी अथायु मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल कोल्हापूर गेले सात आठ वर्षे या जिल्ह्यामध्ये आरोग्य कॅम्प लावून गोरगरीब रुग्णांना दिलासा देण्याचे महान कार्य या रुग्णालयामार्फत होत आहे हे कौतुकास्पद आहे .*
*तशाच प्रमाणे आमच्या गोरगरीब रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळत आहे तसेच शस्त्रक्रिया मोफत औषधे व जेवण या योजनेअंतर्गत मिळत आहे याचे समाधान आमच्या सारख्या डॉक्टरांना मिळत आहे आमच्या उपजिल्हा रुग्णालयामार्फत जेवढे सहकार्य मिळेल तेवढे आम्ही वेळोवेळी करायला तयार आहोत असे सुद्धा उदगार डॉक्टर प्रवीण देसाई यांनी काढले*
*यावेळी आभार प्रदर्शन आता अथायु मल्टी स्पेशलिस्ट चे मार्केटिंग हेड श्री मदन गोरे यांनी सर्व उपजिल्हा रुग्णालय डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचारी परिचारिका व आरोग्य स्टाफ तसेच शिरोडा गावातील पंचक्रोशीतील रुग्ण व त्यांचे नातेवाईक व नागरिक यांचे आभार मानून या महाआरोग्य शिबिराचा निरोप घेऊन सर्व अथायु मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे डॉक्टरांकडून तपासणी करून त्यांना लवकरच कोल्हापूर अथायु मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल तर्फे गोरगरीब रुग्णांसाठी हॉस्पिटल तर्फे बस सेवा मोफत देणार आहे असे सांगण्यात आले*.
*यावेळी या महा आरोग्य शिबीर झाला अनेक रुग्णांनी तपासणी करून मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी नोंदणी केलेली आहे अशी माहिती सावंतवाडी चे जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजू मसुरकर यांनी दिली आहे*
*राजेंद्र प्रभाकर मसुरकर*
*जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सोने चांदी दागिन्यांचे व्यापारी*
*उभाबाजार, सावंतवाडी*
*मो.9422435760*