You are currently viewing राज्य क्रीडा दिनामित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

राज्य क्रीडा दिनामित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

राज्य क्रीडा दिनामित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी

 ऑलम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन 15 जानेवारी हा दिवस दरवर्षी राज्य क्रीडा दिन म्हणुन साजरा केला जातो. सन 2023 पासुन याची अमंलबजावणी सुरु झाली आहे.याच क्रीडा दिनाचे औचित्य साधुन जिल्हा क्रीडा विभागाने विविध कार्यक्रमांचे जिल्ह्यात आयोजन केलेले आहे.

 यामध्ये ऑलम्पिकवीर खाशाबा जाधव यांची जीवनगाथा व त्यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान यावरील व्याख्यान न्यु इंग्लिश स्कुल, ओरस येथे आयोजित करण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांसाठी कुस्ती या खेळासंदर्भातील नियमावली याबाबत मार्गदर्शन शिबिर शिवाजी इंग्लिश स्कुल, पणदुर येथे आयोजित करण्यात आलेले आहे आणि दि.16 जानेवारी रोजी तालुका क्रीडा संकुल, वेंगुर्ला येथे विशेष एकदिवसीय कुस्ती प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे.

तसेच क्रीडा दिनाचे औचित्य साधुन 2024-25 या वर्षातील जिल्ह्यातील गुणवंत राष्ट्रीय व राज्य खेळाडुंचा गौरव जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये यांना शाळास्तरावर राज्य क्रीडा दिन साजरा करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत करण्यात आलेले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा