You are currently viewing सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात महाआरोग्य शिबिराचे सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते शुभारंभ संपन्न 

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात महाआरोग्य शिबिराचे सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते शुभारंभ संपन्न 

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात महाआरोग्य शिबिराचे सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते शुभारंभ संपन्न

सावंतवाडी

*अथायु मल्टिस्पेशालिस्ट हाॅस्पिटल कोल्हापूर व सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे मंगळवार दि. 14/1/2025 ) रोजी महाआरोग्य शिबिराचे सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला*.

*सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय व अथायु मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल कोल्हापूर गोकुळ शिरगाव रोड विमानतळा शेजारी यांच्या संयुक्त विद्यमाने आज मंगळवार 14 जानेवारी 2025 रोजी सकाळी साडेदहा वाजता सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे महाआरोग्य शिबिर भरवण्यात आले होते*.

*यावेळी महात्मा फुले जीवनदायी जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांनी तपासणी करून या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला*.

*यावेळी संस्थांचे राजे युवराज लखन राजे भोसले या कार्यक्रमाला उपस्थित होते*.

*यावेळी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री राजू मसुरकर, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर गिरीश चौगुले, जनरल सर्जन स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर ज्ञानेश्वर ऐवळे, तसेच या कार्यक्रमाला अथायु मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलचे डॉक्टर सुदेश मुळीक ,डॉक्टर रघुनाथ नाईक मार्केटिंगचे हेड श्री मदन गोरे, तसेच विवेक चव्हाण ,श्री वैभव काटकर अथायु हॉस्पिटलचे पी आर ओ श्री किरण पाटील, रोहित कुरणे, गौरव आपटे हॉस्पिटलचे सारथी श्री संदीप पाटील वगैरे आरोग्य कर्मचारी तसेच सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव तसेच रूपा मुद्राळे ओमकार पडते ,संजय तानावडे तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे आरोग्य कर्मचारी परिचारिका रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक या महा आरोग्य शिबिराला उपस्थित होते*

*यावेळी सावंतवाडी संस्थांचे युवराज लखन राजे भोसले यांच्या यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून तसेच दीप प्रज्वलन करून या महा आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.*

*यावेळी संस्थांची युवराज लखन राजे भोसले यांनी अथायु मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल कोल्हापूर या रुग्णालयाने अनेक रुग्ण शस्त्रक्रिया करून चांगल्या प्रकारे सेवा दिली आहे*

*त्याचप्रमाणे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये चांगल्या प्रकारे आरोग्यसेवा रुग्णांना मिळत आहे हे मी वृत्तपत्रांतून नेहमीच वाचत असतो.*

*आणि यासाठी वेळोवेळी सहकार्य आमच्या राजघराण्याकडून गोरगरिबांना मिळेल असे भावपूर्ण उदगार सावंतवाडी संस्थांचे युवराज लखन राजे सावंत भोसले यांच्याकडून काढण्यात आले.*

*तसेच यावेळी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक गिरीश चौगुले यांनी मनोगत व्यक्त करून युवराज लखन राजे भोसले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे स्त्री रोग तज्ञ ज्ञानेश्वर ऐवळे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अथायु मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्णांना शस्त्रक्रिया करून चांगली आरोग्य सेवा या रुग्णालयाकडून मिळत आहे. असे भावपूर्ण उदगार डॉक्टर ज्ञानेश्वर ऐवळे यांनी काढले.*

*अथायु रुग्णालयाचे मार्केटिंग मॅनेजर श्री मदन गोरे यांनी आभार मानून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असणाऱ्या रुग्णांना चांगल्या प्रकारे शस्त्रक्रिया करून आमचे अथायु मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलचे रुग्णालय रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध असून चांगली आरोग्य सेवा देणे हे रुग्णालयाचे कर्तव्य समजतो असे त्यांनी आभार प्रदर्शनाच्या वेळी उदगार काढले.*

*यावेळी बहुसंख्य रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतला यावेळी अनेक नागरिक या महा आरोग्य शिबिराला उपस्थिती लावली होती.*

*यावेळी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मसुरकर यांनी या शिबिरास मार्गदर्शन करताना म्हणाले की महात्मा फुले जीवनदायी जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया औषधे व रुग्णांना जेवण रुग्णांना मोफत दिले जाते महाराष्ट्रामध्ये खाजगी रुग्णालय शासनाने विविध जिल्ह्यांमध्ये 2000 रुग्णालय नेमणूक केलेली आहे*.

*त्यामध्ये रुग्णालयामध्ये वेगवेगळे आजार वेगवेगळ्या रुग्णालयाला दिले आहेत कोल्हापूर अथायु मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल गेले सात आठ वर्षे जिल्ह्यामध्ये मोफत आरोग्य शिबिर लावून रुग्णांना चांगली सेवा देत आहेत*

*तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस पक्षाचे सरकार असताना 2012 व 2013 या काळामध्ये ही आरोग्य योजना योजना महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यापैकी आठ जिल्ह्यांना लागू होती त्यामध्ये सिंधुदुर्ग, जिल्हा रत्नागिरी ,कोल्हापूर सातारा ,सांगली, पुणे असे विविध 28 जिल्हे या आरोग्य योजने मध्ये नव्हते.*

*त्यावेळी संस्थांचे राजवाड्यामध्ये श्रीमती सत्वशीला देवी राणी भोसले यांना खाजगी भेटीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सावंतवाडी मध्ये 2013 नोव्हेंबर पूर्वी आले असता जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान अध्यक्ष यांनी संपूर्ण महाराष्ट्रात राजीव गांधी जीवनदायी जन आरोग्य योजना मंजूर करण्यासाठी निवेदन दिले होते*.

*माझ्या सोन्या-चांदीचा व्यवसाय असून गोरगरीब रुग्ण आपले दाग दागिने विकतात जमिनी गहाण ठेवतात. कर्ज काढतात. आपले रुग्णांची खाजगीरीत्या शस्त्रक्रिया करून घेतात हे डोळ्यातील अश्रू मी पाहत नाही. मी आरोग्य क्षेत्रामध्ये वाहून घेतलेला आहे असे मसूरकर यांनी त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सांगण्यात आले होते*.

*राजघराणे व मुख्यमंत्री*
*पृथ्वीराज चव्हाण यांचे* *नातेसंबंधामुळे त्यावेळी एक* *महिन्यांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना ही राजीव गांधी जीवनदायी जन आरोग्य योजना म्हणून मुख्यमंत्री पृथ्वीराजचव्हाण यांनी मंजूर करण्यात आले*.

*त्यानंतर हे नाव 2017 या काळी* *या योजनेचे नाव महात्मा फुले जीवनदायी जन आरोग्य योजना म्हणून मागील सरकारने करण्यात आले.*

*गेल्या पाच वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेपैकी 97 लाख 29 हजार रुग्णांनी या योजनेचा मोफत लाभ घेऊन शस्त्रक्रिया औषधे व जेवण शासनाने नेमणूक केलेल्या खाजगी रुग्णालयामध्ये मोफत करून घेतले आहेत.*

*आताच्या शासनाने एक लाख पन्नास हजार वरून आता या शासनाने पाच लाख रुपये प्रति वर्षी ही जीवनदायी जन आरोग्य योजना जुलै 2024 पासून ‌मंजूर करण्यात आली.*

*आज संपूर्ण महाराष्ट्र मध्ये १३५६ प्रकारचे वेगवेगळे आजार वेगवेगळ्या खाजगीरीत्या रुग्णालयात दिले आहेत याचे समाधान माझ्यासारखा सर्वसामान्य आरोग्य सेवेमध्ये काम करत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला समाधान लाभले आहे गोरगरिबांचे अश्रू पुसण्याचे काम माझ्या हातून झाले व मला पुण्य काम करण्याची ताकद ईश्वराने दिलेली आहे रुग्णालय हे माझे मंदिर समजतो त्यामध्ये रुग्ण कुठल्या ईश्वराच्या रूपाने येईल हे मला सांगता येणार नाही*

*गोरगरिबांच्या आशीर्वाद हे मला लाभलेले आहेत मी आरोग्य क्षेत्रामध्ये काम करत असताना गरीब श्रीमंत जात धर्म पक्ष अशा प्रकारचे कोणतेही असा भेदभाव न बघता सर्वसामान्य रुग्णांची सेवा करण्यासाठी‌ माझा ईश्वर यांनी माझा जन्म केला आहे असे मी समजत असतो*

*त्याचप्रमाणे राजघराणे सावंतवाडीच्या संस्थांसाठी जनतेसाठी मौल्यवान कार्य केले आहे हे न विसरता येण्यासारखे आहे असे उदगार मसुरकर यांनी काढले आहे*

*राजेंद्र प्रभाकर मसुरकर*
*जीवनरक्षा वैद्यकीय* *प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सोने चांदी दागिन्यांचे व्यापारी*
*उभाबाजार, सावंतवाडी*
*मो.*9420435760*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा