जिंकलो मी, हरलो मी,
हार-जीत पण नित्याचीच.
काय मिळवलं, काय गमावलं,
यादी मोठी केवळ नावाचीच.
सुख समजून ज्यास जपलं,
क्षणिकच ते मृगजळ ठरलं.
दुःख नाही जपत कुणीही,
भीती त्याची कायमचीच.
जीव लावा,ओवाळूनी टाका,
समज येता विसरुनी जाती.
रस शोषूनी फुलपाखरेही,
फुलांवरून उडती सदाचीच.
का मनास गुंतून ठेवावे,
सांगून टाकावे एकदाचे.
नसते कोणीच हक्काचे,
नाती फक्त निमित्ताचीच.
दुखावलेलं हृदय रडतं,
आसवं आटतात डोळ्यात.
हृदयावर उमटतील ओरखडे,
ओळख भाबड्या प्रेमाचीच.
(दिपी)✒️
दीपक पटेकर
८४४६७४३१९६