You are currently viewing छत्रपती ताराराणी साहेब एक कुशल योद्धा आणि रणनीतीकार होत्या – शिवरत्न शेटये

छत्रपती ताराराणी साहेब एक कुशल योद्धा आणि रणनीतीकार होत्या – शिवरत्न शेटये

छत्रपती ताराराणी साहेब एक कुशल योद्धा आणि रणनीतीकार होत्या – शिवरत्न शेटये

सिंधू सहयोग प्रतिष्ठानच्या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद…

सावंतवाडी

छत्रपती ताराराणी साहेब या एक कुशल योद्धा आणि रणनीतीकार होत्या. औरंगजेबाच्या नेतृत्वाखालील मुघल सैन्याविरुद्ध मराठा साम्राज्याचे रक्षण करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ताराराणी साहेब यांनी औरंग्याच्या सैन्याला आणले त्यांनी अतुलनीय पराक्रमाने औरंग्याला या मातीतच गाडले, असे प्रतिपादन हिंदवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवरत्न शेटये यांनी सावंतवाडीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले.

सिंधू सहयोग प्रतिष्ठान तर्फे ताराराणी साहेब यांच्या गौरवशाली इतिहासाबाबत लोकांना माहिती व्हावी यासाठी शेटे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपिठावर अँड शामराव सावंत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सिंधुदुर्ग जिल्हा कार्यवाह लवू म्हाडेश्वर, सावंतवाडीचे माजी नगरसेवक उदय नाईक, नाग्या महादू कातकरी आदिवासी वसतिगृहाच्या संस्थापिका सौ. उजा आईर, ज्येष्ठ आयुर्वेद चिकित्सक डॉ. सौ. शुभदा करमरकर, सौ. अनघा शिरोडकर, सौ. शिल्पा मेस्त्री आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात सौ. उजा उदय आईर, डॉ. सौ. शुभदा करमरकर, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक राजलक्ष्मी राणे यांचा त्यांच्या कार्याबद्दल यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी लवू महाडेश्वर, ऊजा आईर डॉ शुभदा करमळकर यांनी सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या विविध उपक्रमांसह कार्याचे कौतुक करीत दुर्गम भागात करीत असलेल्या आरोग्य सेवेचा आवर्जून उल्लेख केला.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला कु. युक्ता सापळे हिने महाराणी ताराराणीची वेशभूषा करून सादर केलेला प्रवेश लक्षवेधी ठरला. कार्यक्रमाची सांगता सौ. मिना उकिडवे यांनी गायलेल्या सुश्राव्य वंदे मातरमने झाली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सिंधुमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रविणकुमार ठाकरे यांनी प्रतिष्ठानच्या विविध उपक्रमांसह कार्याचा आढावा घेतला. सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे डॉ. राहुल गव्हाणकर तर आभार गुरुनाथ राऊळ यांनी मानले. यावेळी शेटे यांनी आपल्या दोन तासाच्या व्याख्यानात ताराराणी साहेब यांचा जीवनपट उपस्थिताना उलगडून दाखवला. ते म्हणाले, ताराराणी साहेब या शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम महाराज यांच्या पत्नी शिवाजी महाराजांचे राज्यकारभाराचे गुण ताराराणी साहेब यांच्यात दिसून येतात. छत्रपती ताराराणी ज्यांना महाराणी ताराबाई भोसले असेही म्हणतात.

ताराराणी यांचा जन्म १६७५ मध्ये मराठा सेनापतींच्या कुटुंबात झाला. तिचे वडील हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याचे सरसेनापती होते. ताराराणी यांना लहानपणापासूनच युद्धशास्त्राचे प्रशिक्षण मिळाले होते. राजकारण आणि मुत्सद्देगिरीचे धडे घरात मिळाल्याने त्या राजकारणात पारंगत होत्या.

१६८७ मध्ये ताराराणीचा विवाह छत्रपती राजाराम यांच्याशी झाला. तिच्या पतीच्या मृत्यूनंतर १७०० मध्ये त मराठा साम्राज्याची रीजेंट बनली. त्यावेळी औरंगजेबाच्या नेतृत्वाखालील मुघल सैन्याकडून मराठा साम्राज्याला धोका होता. ताराराणी साहेबांनी हे आव्हान स्वीकारले. मराठा सैन्याला मुघलांवर अनेक विजय मिळवून दिले. ताराराणी साहेबांनी औरंग्याच्या सैन्याला जेरीस आणले तब्बल सात वर्षे औरंग्याने लढाई केली परंतु त्याचा टिकाऊ लागला नाही शेवटी त्याने या मातीत प्राण सोडले. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर २५ मार्च १६८९ मोगलांनी रायगडाला वेडा घातला असता त्या छत्रपती राजाराम महाराज यांच्यासह रायगडावरून निसटून गेल्या. छत्रपती राजाराम महाराज जिंजी ला गेल्यानंतर महाराणी ताराबाई, राजसबाई विशाळगड येथे राहिल्या. रामचंद्रपंत अमात्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विशाळगड येथे लष्करी व मुलकी व्यवहाराची माहिती घेतली.

प्रतिक्रिया व्यक्त करा