You are currently viewing “महेंद्र भारती यांनी सामाजिक एकोपा निर्माण केला!” – डॉ. श्रीपाल सबनीस

“महेंद्र भारती यांनी सामाजिक एकोपा निर्माण केला!” – डॉ. श्रीपाल सबनीस

*”महेंद्र भारती यांनी सामाजिक एकोपा निर्माण केला!” – डॉ. श्रीपाल सबनीस*

*नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने महेंद्र भारती सन्मानित*

पिंपरी

“बाबा भारती प्रतिष्ठानच्या माध्यमातून अभिजात पाली भाषेचे जतन, संवर्धन आणि संशोधन करीत असताना महेंद्र भारती यांनी सामाजिक एकोपा निर्माण केला!” असे गौरवोद्गार ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी संकल्प गार्डन कार्यालय, आळंदी रोड, वडमुखवाडी, चऱ्होली येथे शनिवार, दिनांक ११ जानेवारी २०२५ रोजी काढले.
नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने आयोजित केलेल्या विशेष सन्मान सोहळ्यात डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे, नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, एस. के. एफ. एम्प्लॉईज युनियन अध्यक्ष सुनील आव्हाळे, माजी सभापती सुभाष उमाप, श्रमश्री बाजीराव सातपुते यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

सन्मानचिन्ह, श्रीतुकाराममहाराज यांची गाथा, शाल, पुष्पगुच्छ असे सन्मानाचे स्वरूप होते.

डॉ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, “लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानच्या माध्यमातून महेंद्र भारती आपल्या वडिलांचे सामाजिक आणि पाली भाषा संवर्धनाचे कार्य अतिशय तळमळीने पुढे नेत आहेत. बाबा भारती यांच्या जन्मशताब्दीनिमित्त संपूर्ण वर्षभर राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक अभिसरण घडेल, असा विश्वास वाटतो!”
पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी, “पन्नास वर्षांहून अधिक काळापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. राहुल सांस्कृत्यायन अशा अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वांपासून प्रेरणा घेऊन बाबा भारती यांनी विविध ग्रंथांचे लेखन केले. त्या गोष्टींचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न बाबा भारती करीत आहेत!” असे विचार मांडले. सुदाम भोरे यांनी आपल्या मनोगतातून, “समाजातील सर्वधर्मीय व्यासंगी अन् विचारवंतांच्या कार्याची दखल घेऊन निरपेक्षपणे त्यांचा सन्मान करण्याची महेंद्र भारती यांची वृत्ती खूप भावली. त्यामुळेच नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या माध्यमातून त्यांचा विशेष सन्मान करण्याचा एकमताने निर्णय घेतला!” अशी भूमिका मांडली.

सत्काराला उत्तर देताना महेंद्र भारती यांनी, “माझे वडील बाबा भारती हे समाजात लोकशिक्षक म्हणून सुप्रसिद्ध होते. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांनी संपादित केलेल्या पाली – मराठी शब्दकोशाची नूतन आवृत्ती महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रकाशित करण्यात यश मिळाले. आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून पाली भाषेचे विद्यार्थी, अभ्यासक आणि संशोधक यांना शैक्षणिक साहाय्य मिळावे यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने प्रयत्नशील आहोत. आजचा सन्मान ही वडिलांच्या कार्याची पुण्याई आहे!” अशी कृतज्ञतापर भावना व्यक्त केली.

पुरुषोत्तम सदाफुले यांनी प्रास्ताविकातून लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती दिली. नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या पदाधिकाऱ्यांनी संयोजनात सहकार्य केले. सीमा गांधी यांनी सूत्रसंचालन केले. मनाली सातपुते यांनी आभार मानले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

______________________________
*संवाद मीडिया*

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.)

*वारस होऊ सैनिकी परंपरेचे…*

काळानुरूप जलदगतीने बदलत जाणाऱ्या शैक्षणिक गरजा, विज्ञान व माहिती तंत्रज्ञानाच्या
युगात, वाढत्या स्पर्धात्मक जीवनात जिद्दीने आणि महत्वाकांक्षी वृत्तीने यशस्वी होणारे विद्यार्थी
निर्माण करण्याचे पवित्र आणि प्रामाणिक ध्येयरूपी कार्य सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट एक्स सर्व्हिसमेन
असोसिएशन संचलित शासनमान्य सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली गेली 21 वर्षे अविरतपणे करित आहे.

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.)

*🏆An Award Winning School🏆*

महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..

Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

💁‍♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲

👉शैक्षणिक वर्ष 2025 – 26 करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ६ वी च्या वर्गासाठी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु

*✨आमची वैशिष्ट्ये✨*

➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division

📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
https://forms.gle/vPE7oVGpsLmEUMw68

*www.sindhudurgsainikschool.com*
वरील लिंकवर ऑनलाईन नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.

*💁‍♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*

*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*

*जाहिरात 
————————————————
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा