दोडामार्ग उबाठा शिवसेनेच्या वतीने कोनाळ जि. प विभागात गावभेट दौरा
पक्ष हितासाठी पुन्हा जोमाने काम करुया ; तालुका प्रमुख संजय गवस
दोडामार्ग-
दोडामार्ग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या वतीने गावभेट कोनाळ जि. प विभागात झाला, यावेळी प्रत्येक गावात शाखा प्रमुख, बुथ प्रमुख व कार्यकर्ते यांची भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी बदलत्या राजकारणाबद्दल चर्चा केली.आपण पक्ष हितासाठी पुन्हा जोमाने काम करुया तसेच मराठी माणसांच्या भवितव्यासाठी शिवसेना पुन्हा उभी राहिली पाहिजे,ओहोटी नंतर भरती येते हा नियतीचा नियम आहे.पुन्हा एकदा आम्ही त्या वेगाने जोषाने महाराष्ट्रात उभे राहू,असे पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.
त्यावेळी उपस्थित शाखा प्रमुख व कार्यकर्त्यांनी सत्ता असो या नसो आपली चिन्ह पक्ष फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे असे वचन दिले. यावेळी तालुका प्रमुख संजय गवस, युवा सेना तालुका प्रमुख मदन राणे, महिला आघाडी उपजिल्हा संघटक विनिता घाडी, उपजिल्हा संघटक विजय जाधव,विभाग प्रमुख संतोष मौर्य, उप तालुका संघटक संदेश वरक, संदेश राणे महिला विभाग प्रमुख जेनिफर लोबो रेश्मा,शेख, युवासेना संदेश गवस प्रदिप गावडे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.