– भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश सावंत
कणकवली
कणकवली मतदारसंघात आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपची एक हाती सत्ता ग्रामपंचायत मध्ये आली. सतीश सावंत ही व्यक्ती जिल्ह्यात ज्या पक्षात जाईल तेथे पराभवाची मालिका सुरू करेल. शिवसेनेतील गटबाजी साठी येत्या काळात ते पोषक वातावरण निर्माण करतील हे निश्चित आहे. व आजच्या ग्रामपंचायत निकालातून त्यांनी ते दाखवूनही दिले आहे. यापूर्वी सतीश सावंत राणें सोबत असताना शिवसेनेचे कणकवलीत एक कार्यालय होते. त्या ठिकाणी आता शिवसेनेची दोन कार्यालय सुरू झाली. जुनी आणि नवीन अशी दुफळी निर्माण करून सतीश सावंत यांनी राणेंबरोबर असताना जी कारस्थाने केली तीच शिवसेनेत करायला सुरुवात केली आहेत. सतीश सावंत यांच्या बरोबर कार्यकर्ते नाही तर ठेकेदारांचा लवाजमा असतो. कारण त्यांच्या शिवसेना प्रवेशानंतर ठेकेदार वाढले पण कार्यकर्ते सर्व भाजपबरोबर राहिले. जिल्हा बँकेत नोकरी देतो असे सांगून आपल्या सोबत कार्यकर्ते गोळा करण्याचा प्रयत्न सतीश सावंत करत आहेत. मात्र हे कार्यकर्ते ज्याप्रमाणे नोकरीवर तात्पुरते ठेवले तसे सावंत यांच्या सोबत तात्पुरतेच राहणार आहेत. जिल्हा बँक वर भाजपची सत्ता आली की पुन्हा एकदा यांची झोळी रिकामी होणार आहे. भिरवंडे गावच्या तीन जागांसाठी सतीश सावंत हे दुपारी तीन वाजेपर्यंत गावात थांबून होते. ज्या व्यक्तीला स्वतःच्या गावात दुपार पर्यंत थांबावे लागते त्याने आमदार नितेश राणे यांच्या 2024 मधील निवडणूकीची चिंता करू नये. जो माणूस कणकवली तालुका सांभाळू शकत नाही त्याने विधानसभा लढवण्याची स्वप्ने पाहण्याच्या भानगडीत पडू नये.