*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुदलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मकर संक्रांत*
मकर राशीत
सूर्य प्रवेश करतो
योग घडतो
संक्रांतीचा….
आपल्या परंपरात
जुन्या नव्याची सांगड
सणांची आवड
गृहिणींना….
महत्व दानाचे
संक्रांतीच्या आहे सणात
एकमेकींना भेटण्यात
आनंद….
भोगी संक्रांत
ताजी भाजी फळे
आहारात आगळे
महत्व….
सुगडी पुजून
सगळ्यांना तिळगुळ वाटायचे
गोड बोलायचे
वचन……
काळी चंद्रकळा
शुभ्र हलव्याचे दागिने
नवपरिणीता आनंदाने
सजते…..
बोरन्हाण बाळाचे
रूप सुंदर खुलते
बालकांना असते
अपुर्वाई……..
सणांमधून संस्कार
घडतात छान मनावर
व्यक्तीमत्व सुंदर
घडते…..!!
~~~~~~~~~~~~
अरुणा दुद्दलवार @✍️