You are currently viewing बाई ग

बाई ग

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ.अर्चना मायदेव यांची अप्रतिम काव्यरचना

रंगांची ही उधळण होते
सांज वेळेला बाई ग
निशा येतसे लाजत मुरडत
चंद्रास भेटण्या बाई ग

सांज वेळ ही आठव येता
विरह जाळतो बाई ग
येता दाटूनी सय नयनी
ह्या अश्रू ढळतो बाई ग

विरहात तुझ्या सख्या अशी
ही काळोखाची रात ग
दिसताच सख्याची सावली बाई
विरहावर आनंदाची मात ग

सागर तीरी आपण दोघे
स्वप्न दिसले बाई ग
जागृती येता कुणीच दिसेना
खेळ हे कसले बाई ग

आठवात तुझ्या सख्या रे
मी तीळ तीळ तुटते बाई ग
लख लखाणारा दिवा कसा बघ
मिणमिण करतो बाई ग

सौ. अर्चना मायदेव
ऑस्ट्रेलिया
२/६/२२

प्रतिक्रिया व्यक्त करा