You are currently viewing छत्रपती ताराराणी साहेब या एक कुशल योद्धा आणि रणनीतीकार होत्या

छत्रपती ताराराणी साहेब या एक कुशल योद्धा आणि रणनीतीकार होत्या

हिंदवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवरत्न शेट्टी यांचे व्याख्यान

सावंतवाडी :

छत्रपती ताराराणी साहेब या एक कुशल योद्धा आणि रणनीतीकार होत्या. औरंगजेबाच्या नेतृत्वाखालील मुघल सैन्याविरुद्ध मराठा साम्राज्याचे रक्षण करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ताराराणी साहेब यांनी औरंग्याच्या सैन्याला आणले त्यांनी अतुलनीय पराक्रमाने औरंग्याला या मातीतच गाडले असे प्रतिपादन हिंदवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवरत्न शेट्टी यांनी सावंतवाडीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले सिंधू सहयोग प्रतिष्ठान तर्फे ताराराणी साहेब यांच्या गौरवशाली इतिहासाबाबत लोकांना माहिती व्हावी यासाठी शेटे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते शिवाजी महाराजांच्या निधनानंतर हिंदवी स्वराज्याचे त्यांनी रक्षण केले शिवाजी महाराजांचा कारभार ते पानिपतची लढाई हा कालखंड त्यांनी पाहीला असेही शेटे  म्हणाले.

शिवरत्न शेटे यांनी आपल्या दोन तासाच्या व्याख्यानात ताराराणी साहेब यांचा जीवनपट उपस्थितांना उलगडून दाखवला. ते म्हणाले ताराराणी साहेब या शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम महाराज यांच्या पत्नी. शिवाजी महाराजांचे राज्यकारभाराचे गुण ताराराणी साहेब यांच्यात दिसून येतात. छत्रपती ताराराणी ज्यांना महाराणी ताराबाई भोसले असेही म्हणतात.

ताराराणी यांचा जन्म १६७५ मध्ये मराठा सेनापतींच्या कुटुंबात झाला. तिचे वडील हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याचे सरसेनापती होते. ताराराणी यांना लहानपणापासूनच युद्धशास्त्राचे प्रशिक्षण मिळाले होते.  राजकारण आणि मुत्सद्देगिरीचे  धडे घरात मिळाल्याने त्या राजकारणात पारंगत होत्या

१६८७ मध्ये ताराराणीचा विवाह छत्रपती राजाराम  यांच्याशी झाला. तिच्या पतीच्या मृत्यूनंतर १७०० मध्ये मराठा साम्राज्याची रीजेंट बनली. त्यावेळी औरंगजेबाच्या नेतृत्वाखालील मुघल सैन्याकडून मराठा साम्राज्याला धोका होता. ताराराणी साहेबांनी हे आव्हान स्वीकारले. मराठा सैन्याला मुघलांवर अनेक विजय मिळवून दिले. ताराराणी साहेबांनी औरंग्याच्या सैन्याला जेरीस आणले तब्बल सात वर्षे औरंग्याने लढाई केली परंतु त्याचा टिकाऊ लागला नाही शेवटी त्याने या मातीत प्राण सोडले संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर २५ मार्च १६८९ रोजी मोगलांनी रायगडाला वेडा घातला असता त्या छत्रपती राजाराम महाराज यांच्या सह रायगडावरून निसटून गेल्या. छत्रपती राजाराम महाराज जिंजी ला गेल्यानंतर महाराणी ताराबाई, राजसबाई  विशाळगड येथे राहिल्या. रामचंद्रपंत अमात्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विशाळगड येथे लष्करी व मुलकी व्यवहाराची माहिती घेतली.

९ जून १६९६ रोजी महाराणी ताराबाईंना शिवाजी (दुसरा) हा पुत्र झाला. ३ मार्च १७०० रोजी छत्रपती राजाराम महाराजांचा सिंहगड किल्ल्यावर मृत्यू झाला. त्याच्यानंतर मराठी साम्राज्याची सूत्रे ताराबाईंनी हाती घेतली.  त्यांच्या सैन्यामध्ये शूरवीर सेनानी होते. त्यांनी मोघलांना सळो की पळो करून ठेवले. सन १७०५ मध्ये त्यांनी मोघलांच्या ताब्यातील पन्हाळा किल्ला जिंकून कारंजा ही राजधानी बनवली. महाराणी ताराबाई यांनी मराठा साम्राज्याला खंबीर नेतृत्व दिले. छत्रपती राजाराम महाराजा नंतर मराठी राज्याला नेतृत्व नसताना ताराबाई यांनी मराठी राज्य टिकवून ठेवले. ताराबाईंनी मोगली फौज्यांना मागे सारण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. मराठ्यांची खालावलेली आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी त्यांनी मोगली मुलकांवर स्वाऱ्या करून चौथाई आणि सरदेशमुखी गोळा करून आर्थिक बळ वाढवले. ताराबाईंनी कोल्हापूरच्या राजगादीचीही स्थापना केली. सरसेनापती संताजी व धनाजी यांना बरोबर घेऊन त्यांनी मोघलांना सळो की पळो करून सोडले. ताराबाई औरंगजेबाच्या प्रचंड मुघल सैन्या विरुद्ध लढत असताना त्या केवळ २५ वर्षाच्या होत्या. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर ताराबाईंनी मुलगा शिवाजी (दुसरा) याला गादीवर बसवले. आणि रामचंद्रपंत अमात्य यांच्या सल्ल्याने मराठा राज्याचा कारभार पाहण्यास सुरुवात केली.

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर संभाजी राजेंची पुत्र शाहू यांची मोगलांनी सुटका करताना महाराष्ट्रात दुहीचे बीज पेरले. शाहु महाराज हेच मराठा राज्याचे उत्तर अधिकारी‌ असल्याचे अनेक सरदार सेनानी यांना वाटू लागले. दोन्ही बाजूनी छत्रपती पदाच्या वारसा हक्कावरून संघर्ष सुरू झाला. या काळात ताराबाईंच्या पक्षातले खंडो बल्लाळ, धनाजी जाधव यासारखे सेनानी शाहूंच्या पक्षात गेले. शाहू राजांनी महाराणी ताराबाई आणि त्यांचा पुत्र शिवाजी (दुसरा) यांच्या विरुद्ध युद्ध पुकारले.१७०७ साली झालेल्या खेड लढाईत शाहू राजांचा विजय झाला. ताराबाईंनी जिंकलेले सर्व किल्ले शाहू राजांना मिळाले. बाळाजी विश्वनाथ यांनी ताराराणीच्या पक्षातील उदाजी चव्हाण, चंद्रसेन जाधव, कान्होजी आंग्रे, पिलाजी गोळे आधी सेनानींना आपल्या पक्षात वळवून घेतले त्यामुळे शाहूंचा पक्ष बळकळ झाला. शाहूनी साताऱ्याला गादीची स्थापना केली आणि ताराबाईने साताराहून माघार घेऊन कोल्हापूर येथे वेगळी गादी स्थापन केली. परंतु राजारामांची दुसरी राणी राजसबाई यांनी ताराबाईंना पदच्युत केले आणि त्यांचा मुलगा संभाजी दुसरा याला गादीवर बसवले.

महाराणी ताराराणी यांचे निधन ९ डिसेंबर १७६१ रोजी साताऱ्यात झाले. छत्रपती राजाराम महाराजांना तीन पत्न्या होत्या पत्नी ताराबाई यांच्यापासून छत्रपती शिवाजी (दुसरा) आणि राजसबाई यांच्यापासून छत्रपती संभाजी (दुसरा) हे पुत्र होते. तसेच अंबिका बाई या त्यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. २५ वर्षाची एक विधवा राणी मुगल बादशाह औरंगजेबाशी लष्करी संघर्ष करावयास उभी राहते. सलग सात वर्षे संघर्ष करून त्यास चारी मुंड्या चित करते. ही बाब मराठ्यांच्या इतिहासातील एक असामान्य घटना आहे. मराठ्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील रणरागिनी म्हणून तिचे कार्य देद्दीप्यमान असे आहे.

राजाराम महाराजा नंतर त्यांनी विधवेचे दुःख घेऊन मराठा राज्याची ढासळलेली बाजू सावरून धरण्यासाठी त्यांनी  हाती तलवार घेऊन औरंगजेबाचे लष्करी आव्हान स्वीकारले.

१७०५ मध्ये झालेल्या लढाईत ताराराणीचा सर्वात उल्लेखनीय विजय झाला. या लढाईत मराठा सैन्याने मोगलांच्या मोठ्या सैन्याचा पराभव केला. ताराराणी यांनी १७०७ मधील कोरेगावच्या लढाईतही महत्त्वाची भूमिका बजावली. ज्यात मराठ्यांनी मुघलांचा पराभव केला आणि त्यांना सातारा शहर ताब्यात घेण्यापासून रोखले. १७६१ मध्ये तिच्या मृत्यूपर्यंत ताराराणीने मराठा साम्राज्याचे नेतृत्व केले.

ताराराणी एक दूरदर्शी नेत्या होत्या. त्यांनी शत्रूवर आक्रमक रूप धारण केले त्यामुळे शत्रूला त्यांची जरब होती शत्रूबरोबर लढताना  स्वकीयांशी त्यांचा संघर्ष झाला ज्यांचा मराठा साम्राज्यावर खोलवर प्रभाव पडला होता. ती एक कुशल योद्धा आणि रणनीतीकार होती. आणि तिने शत्रूपासून साम्राज्याचे रक्षण करण्यासाठी तिचे कौशल्य वापरले. ती एक हुशार आणि दयाळू शासक देखील होती आणि तिने साम्राज्यासाठी शांतता आणि समृद्धीचा काळ पाहिला. कठीण काळात मराठा साम्राज्य टिकून राहण्यासाठी संघर्ष केला ताराराणीचा पराक्रम अतुलनीय असा होता त्यांचा  वारसा धैर्य, जिद्द आणि नेतृत्वाचा आहे. तिला भारतातील एक महान योद्धा राणी म्हणून स्मरणात ठेवले जाते.  कहाणी आजही लोकांना प्रेरणा देत आहे.

कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपिठावर अँड शामराव सावंत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सिंधुदुर्ग जिल्हा कार्यवाह लवू म्हाडेश्वर, सावंतवाडीचे माजी नगरसेवक उदय नाईक, नाग्या महादू कातकरी आदिवासी वसतिगृहाच्या संस्थापिका सौ उजा उदय आईर, ज्येष्ठ आयुर्वेद चिकित्सक डॉ. सौ. शुभदा योगेश करमरकर, सौ अनघा शिरोडकर, सौ शिल्पा मेस्त्री आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमा सौ. उजा उदय आईर, डॉ. सौ. शुभदा करमरकर, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक राजलक्ष्मी राणे यांचा त्यांच्या कार्याबद्दल यथोचित सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात लवू महाडेश्वर, ऊजा आईर डॉ शुभदा करमळकर यांनी सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या विविध उपक्रमांसह कार्याचे कौतुक करीत दुर्गम भागात करीत असलेल्या आरोग्य सेवेचा आवर्जून उल्लेख केला.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला कु युक्ता प्रसाद सापळे हिने महाराणी ताराराणीची वेशभूषा करून सादर केलेला प्रवेश लक्षवेधी ठरला. कार्यक्रमाची सांगता सौ मिनाताई उकिडवे यांनी गायलेल्या सुश्राव्य वंदे मातरमने झाली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सिंधुमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रविणकुमार ठाकरे यांनी प्रतिष्ठानच्या विविध उपक्रमांसह कार्याचा आढावा घेतला. सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे डॉ राहुल गव्हाणकर तर आभार गुरुनाथ राऊळ यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा