माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, वीरमाता, वीरपिता यांच्या प्रलंबित अडी अडचणी सोडविण्यासाठी 15 जानेवारी रोजी बैठकीचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, वीरमाता, वीरपिता यांच्या कुटुंबावरील अन्याय, अत्यांचारासंबंधीत व इतर प्रलंबित अडी अडचणी सोडविण्यासाठी पोलीस अधिक्षक यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीची बैठक पोलीस अधिक्षक कार्याल सिंधुदुर्ग येथे दि.15 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात येणार आली असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी दिली आहे.
या बैठकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, वीरनारी, वीरमाता, वीरपिता यांच्या कुटुंबावरील अन्याय,अत्यांचार व त्यासंबंधित भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा आणि त्यांच्या निराकरण करण्यासाठी सिंधुदर्ग जिल्हा पोलीस प्रशासन व संबंधित माजी सैनिक यांच्यात सविस्तर विचार विनीमय करण्यात येणार आहे.
तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्यांची जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग येथे नोंद आहे अशा माजी सैनिक, माजी सौनिक विधवा पत्नी, वीरनारी, वीरमाता व वीरपिता यांनी त्यांच्या कुटुंबावरील अन्याय, अत्यांचारविषयी पोलीस यंत्रणेसंदर्भातील काही समस्या व इतर काही प्रलंबित अडी अडचणी असल्यास सदर प्रकरणांचा लेखी अर्ज व सर्व कागदापत्रासह व त्याबाबत यापुर्वी केलेल्या पत्रव्यवहारासह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग येथे दि.15 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्र. ०२३६२-२२८८२०/ ९३२२०५१२८४ वर संपर्क करावा.