*’आणखी एक मोहेंजो दारो’*
शुक्रवार *१७ जानेवारी २०२५*
*सायंकाळी ४ वाजता*
*मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण*
‘मनीऑर्डर इकॉनॉमी’ असं काहीशा उपहासात्मक सुरात कोकणच्या अर्थव्यवस्थेला हिणवलं जाण्याचा एक काळ होता. पण याच मनी-ऑर्डर्स कोकणच्या आर्थिक-शैक्षणिक उर्जिताव्यवस्थेला प्रथम कारणीभूत ठरल्या हे निःसंशय. या अर्थव्यवस्थेचा मूलाधार होता मुंबईत सुरू झालेला कापड गिरणी उद्योग. यातूनच गिरणसंस्कृती हा नवीन शब्द मराठीत तयार झाला.
निम्न आणि मध्यमवर्गीय कामगार वर्गाने ही संस्कृती जन्माला घातली. या वर्गातील आबालवृद्ध देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात सहभागी झाले. सार्वजनिक गणेश उत्सव, कामगार रंगभूमी, तमाशा, शाहिरी जलसे हे या संस्कृतीचे सांस्कृतिक रूप.
जवळपास दीड शतक केवळ मुंबईचेच नव्हे तर ज्या-ज्या भागांतील कामगार गिरणउद्योगात आले त्या महाराष्ट्रातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मावळ आणि इतर प्रांतांचे अर्थ-राज-संस्कृतीकारण गिरणगावाने प्रेरित होते.
अजूनही अधिकृतपणे न संपलेल्या गिरणी कामगार संपाने या संस्कृतीचा घास घेतला. या संस्कृतीच्या उदय-भरभराट-लुप्त होण्याची गोष्ट म्हणजे *आणखी एक मोहेंजो-दारो* हा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित माहितीपट.
या माहितीपटाच्या निर्मितीतील तीन महत्त्वाचे शिलेदार कालवश जयंत पवार, श्री अशोक राणे आणि नितीन साळुंखे हे तिघेही सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भूमिपुत्र.
पणजी-पणजोबा, आजी-आजोबा, आई-बाबा या आधीच्या तीन पिढ्या या गिरणगाव संस्कृतीत कशा वाढल्या, जगल्या हे अनुभवायचे असेल तर *आणखी एक मोहेंजो-दारो* हा माहितीपट पाहायलाच हवा.
तर मग येताय ना?
*’आणखी एक मोहेंजो दारो’*
कालावधी २ तास १० मिनिटं
शुक्रवार *१७ जानेवारी २०२५*
*सायंकाळी ४ वाजता*
*मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण*