रस्त्यासाठी चौकुळ ग्रामस्थांचे कुडाळात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यालयासमोर आंदोलन…
प्रशासनाच्या विरोधात नाराजी; लेखी उत्तर मिळेपर्यंत माघार घेणार नाही, गुलाबवरा गावडेंचा इशारा…
कुडाळ
सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ येथील मळववाडी बेरडकी चुरणीची मुस व बेरडकी जांभरे या दोन वाड्यांना जोडणार्या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी चौकुळ सरपंच गुलाबराव गावडे यांच्या नेतृत्वाखाली येथील प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. दरम्यान जोपर्यंत आम्हाला ठोस आश्वासन मिळत नाही. तो पर्यंत आम्ही माघार घेणार नाही, असा इशारा श्री. गावडे यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.
आम्ही गेले अनेक महिने मागणी करुन सुध्दा याकडे ठेकेदार आणि अधिकारी जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप यावेळी ग्रामस्थांकडुन करण्यात आला आहे. या दोन्ही रस्त्यांना निधी मंजूर झाला आहे. कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. परंतू अनेक महिने झाले तरी संबंधित ठेकेदराकडुन हे काम सुरू केले जात नाही. परिणामी त्या ठिकाणी रस्ते व मोर्या खराब झाल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे याला जबाबदार कोण? असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे तसेच प्रशासनाच्या नाकर्तेपणाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
यावेळी माजी सरपंच सुरेश शेटवे, चेअरमन पांडुरंग गावडे, संतोष गावडे, दिलीप गावडे, पिलाजी गावडे, बाबु कोकरे, गंगु कोकर, उत्तम नाईक, पांडुरंग नाईक, जानु झोरे, तानाजी नाईक, विशाल नाईक
विठ्ठल वरक आदी उपोषणाला बसले आहेत.