You are currently viewing कवी. विनोद अष्टुळ यांना साहित्य साधना पुरस्कार प्राप्त

कवी. विनोद अष्टुळ यांना साहित्य साधना पुरस्कार प्राप्त

पुणे :

समाज विकास संस्था व निव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त पहिली नैतिक शिक्षण परिषद २०२५, जाई मंगल कार्यालय मांजरी बुद्रुक येथे आयोजित करण्यात आली होती.

कवी विनोद अष्टुळ यांनी साहित्यिक क्षेत्रामध्ये पुणे शहराच्या हडपसर या उपनगरामध्ये साहित्यिक चळवळ सुरू केली आहे. बारा वर्षापासून सुरू असलेल्या या मराठी भाषा संवर्धनासाठी अष्टुळ यांनी विविध उपक्रमांद्वारे द्विशतकी कार्यक्रमापर्यंत अखंड कार्य सुरू ठेवले आहे. त्यांनी मासिक कवी संमेलने, संयुक्त कवी संमेलने, कवींचे वाढदिवस, साहित्यिक श्रावण सहल, काव्य स्पर्धा, आकाशवाणी काव्यवाचन, शब्द गोड दिवाळी, ज्येष्ठांचे मार्गदर्शन, विशेषांक प्रकाशन आणि पुरस्कार असे विविध उपक्रम मराठीसह हिंदी उर्दू इंग्रजी साहित्यिकांना सोबत घेऊन यशस्वी करत असतात. त्यांनी बगीच्या, मंदिरे, सभागृहे, शाळा, कॉलेज, ग्रंथालय, दवाखाने, पदपथ आणि स्मशानभूमी अशा ठिकाणी कार्यक्रम घेतले आहेत. त्यामुळे साहित्यिकांना हक्काचे आणि मोफत व्यासपीठ अष्टुळ यांच्या अथक प्रयत्नातून मिळत आहे. यावर्षी त्यांनी फेब्रुवारी महिन्यात साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. त्यात राज्यातील तसेच परराज्यातील साहित्यिकांना संधी मिळणार आहे. म्हणून अष्टुळ यांना पहिल्या नैतिक शिक्षण परिषदेमध्ये माजी आय एस अधिकारी माननीय श्री अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते साहित्य साधना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी व्यासपीठावरील ज्येष्ठ विचारवंत मा. डॉ. श्रीपाल सबनीस सर, मा.विश्वनाथ तोडकर अध्यक्ष लोक विकास मंच, डॉ. राणी खेडीकर अध्यक्षा बाल विकास समिती महाराष्ट्र राज्य, यांनी विनोद अष्टुळ यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश बेल्हेकर, प्रास्ताविक परिषदेचे मुख्य संयोजक शिवराम कांबळे आणि आभार कृष्णा घुले यांनी व्यक्त केले.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा