*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री पुष्पा सदाकाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सण संक्रांतीचा…*
हुडहुडी ही थंडीची
मास पौषाची गं बाई
सण वर्षाचा पहिला
संक्रांतीची किती घाई
उत्तरायणात रवि
कसा झोपतो निवांत
सोनसळी किरणांची
पडे आम्हाला का भ्रांत
तिळ गुळाचा गोडवा
माझ्या रसाळ वाणीत
नव्या वर्षाच्या स्वागता
आले चांदणं माळीत
आशा स्वप्नांचे पतंग
उंच उडविते नभी
लाडू तिळाचा वाटण्या
उंबरठ्यावर उभी
सुख भरू सुगड्यात
संक्रांतीच्या गोडव्यात
नवी आशा नवी ऊर्जा
नाचू गावूया नव्यात
येती जाती सणवार
जपण्याला हे संस्कार
पोळी खाऊ पुरणाची
करू दुष्टांचा संहार..
रचयिती…
सौ.पुष्पा सदाकाळ… भोसरी पुणे ९०११६५९७४७