आधार फाऊंडेशन, सिंधुदुर्ग तर्फे ६ वर्षाखालील मुलांसाठी स्पर्धांचे आयोजन
वेंगुर्ले
आधार फाऊंडेशन, सिंधुदुर्ग या अराजकीय नोंदणीकृत सामाजिक संस्थेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त १५ जानेवारी रोजी दुपारी ३ ते ७ या वेळेत नगरवाचनालय, वेंगुर्ला येथे शिशु / बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर मेळाव्यात ६ ते ११ महिने यामधील लहान मुलांची ‘रांगण्याची स्पर्धा (अंतर ३० फुट) या विशेष स्पर्धेचे प्रथमच आयोजन करण्यात आले आहे. त्याशिवाय ३ वर्षाखालील मुलांसाठी ‘सुदृढ बालक स्पर्धा’ होईल तसेच ३ वर्षावरील ते ६ वर्षाखालील मुलांसाठी ‘वेशभुषा स्पर्धा’ व ‘बडबडगीत स्पर्धा’ आयोजित केली असून प्रत्येक स्पर्धकाला कमाल २ मिनिटाचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
प्रत्येक स्पर्धेत मोफत प्रवेश ठेवण्यात आला आहे.
प्रत्येक स्पर्धेतील प्रथम तीन कमांकांना आकर्षक बक्षिसे देण्यास येणार आहेत. या स्पर्धेत वेंगुर्ले तालुक्यासह जिल्ह्यातील स्पर्धकही सहभागी होवू शकतात. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी अँड. नंदन वेंगुर्लेकर-९४२२४३४३५६, डॉ. वंदन वेंगुर्लेकर ९८२३६०४३५६ यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन आधार फाऊंडेशन, सिंधुदुर्ग अध्यक्षा माधुरी वेंगुर्लेकर यांनी केले आहे.