*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*
*वेदना*
वेदना मनात खूप असतात
पण सांगायचं कुणाला
आपलीच वाट आपण चुकतो
दोष द्यायचा कुणाला
कोणीच समजून घेत नाही
माझीच समजूत मी काढून घेतो
मुक्या जखमेवर मिच फुंकर मारून घेतो
मोठा झालो म्हणे मी आता
सारं काही सहन करायचं
खोटं खोटं का असेना
हसू चेहऱ्यावर आणायचं
कितीदा घाव द्यायचे
सारे अंगावर घेतो
ओरखडे मनावर घेऊन
शहाण्या सारखा वगतो
माझा मीच एकटा भला
नको सोबत कुणाची
नकळतपणे अश्रुंना
वाट मोकळी करून द्यायची
कोणी कुणाच नसतं
कितीदा समजून झाले
माझेच स्वप्न मी कितीदा भंग केले
गर्दीत त्यांच्या राहून
मागे मी वळून जातो
लढाई आपसांत पाहून
प्रवास जगण्याचा नकोसा होतो
नसते सहानुभूती कुणाची
एकट्यानेच लढायचं असतं
माणूसकी नसलेल्या माणसांच
किती पैशांवर प्रेम दिसतं
मलाच माझे जगणे आहे
साथ कोणी देत नाही
पडलो जरी मी कुठे
जवळ कोणी घेत नाही
अडचणीत माझ्या मला
आधार कुणाचाच नसतो
याची देही याची डोळा
मरण माझे मी पाहून घेतो
*संजय धनगव्हाळ*
*(अर्थात कुसुमाई)*
९५७९११३५४७
९४२२८९२६१८