You are currently viewing काळोखावर मात

काळोखावर मात

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा साहित्य प्रेरणा कट्टा आजगावच्या सन्मा सदस्या लेखिका कवयित्री सौ.स्नेहा धोंडू नारींगणेकर लिखित अप्रतिम अष्टाक्षरी काव्यरचना*

 

*काळोखावर मात*

 

संध्या शामल देखणी

रविराज थबकला

मंदावली तिन्हीसांज

कसा घरी परतला….१

 

वन वादळात उभे

पिसाटला रानवारा

हरवली पायवाट

चमकतो ध्रुवतारा….२

 

वेदनात तेजाळते

जळणारी तेलवात

उरी निराशा पिऊन

अंधारात तिची साथ….३

 

तम रात्रीच्या गर्भात

काळोखात वाढे जरी

प्रसवता पहाटेला

सूर्यप्रभा मात करी….४

 

पूर्व दिशा उजळली

सूर्यबिंब जरा बघ

डोंगरात सोनसरी

किरणांची झगमग….५

 

बघ पुसूनी आसवे

अनंतात एक तारा

रथ हाकतो विश्वाचा

ब्रम्हांडाचा खेळ सारा….६

 

सौ. स्नेहा धोंडू नारिंगणेकर

शिरोडा सिंधुदुर्ग

७०६६९९८७९६

प्रतिक्रिया व्यक्त करा