*वैश्य समाजाचे आज १२ जानेवारीला ठाणे येथे संमेलन **
*वैश्य समाज काल, आज आणि उद्या चर्चासत्र” या विषयावर एका चर्चासत्राचे आयोजन*
*संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे ; वैश्य ग्लोबल बिझनेस ग्रुपचे डॉ. संतोष कामेरकर यांनी केले आवाहन*
कणकवली
मुंबई व परिसरातील तसेच संपूर्ण जगात पसरलेल्या वैश्य समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी झटणाऱ्या वैश्य ग्लोबल बिझनेस ग्रुपतर्फे आज रविवार दि. १२ जानेवारी रोजी समाजबांधवांचे एक भव्य संमेलन सकाळी ८ ते रात्री ७ पर्यंत आर्य क्रीडा मंडळ, ठाणे येथे समाज बांधवांच्या सर्वांगिण विकासाचा ध्यास घेऊन हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
समाजबांधवांच्या क्षमतांची, त्यांच्या कार्याची ओळख करुन देत तरुणांनाही जीवनात पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन व संधीचे आदानप्रदान असे या संमेलनाचे स्वरुप आहे.
सर्वांसाठी सर्वकाही… अशी यावर्षीच्या संमेलनाची संकल्पना आहे. यामध्ये एकमेकांच्या भेटीं बरोबरच काही विशेष उपक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. त्यात आपल्याच समाज बांधवाच्या व्यावसायिक प्रदर्शनाचे दालन असून त्या द्वारे समाजातील तरुण उद्योनमुख तरुणांना नेटवर्किंग ची संधी व प्रेरणादायी मार्गदर्शन मिळेल. याद्वारे समाजातील युवक- युवतींना, विद्यार्थी-पालक यांच्यासाठीही प्रेरणादायी मार्गदर्शन मिळेल. आता सर्वच स्तरावर महिलाही पुढे येत आहेत. आपल्या समाजातील महिलांसाठी विविध संधी व मार्गदर्शन केले जाणार आहे. संमेलनात “वैश्य समाज काल, आज आणि उद्या चर्चासत्र” या विषयावर एक खुले चर्चासत्रही आयोजित करण्यात आले आहे.
संमेलनात पुरस्कार वितरण सोहळा तसेच करमणुकीचे कार्यक्रम असतीलच. त्याचबरोबर काही विशेष संकल्पही आखण्यात आले आहेत. त्याद्वारे वैश्य समाज बांधवांसाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. अनेक यशस्वी, कर्तुत्ववान मान्यवरांना भेटायची संधी उपलब्ध होणार आहे. या कार्यक्रमांतर्गत समाजातील व्यक्तींना आपल्या व्यवसाय वाढीची संधी व बेरोजगारांसाठी नोकरीच्या संधी मिळणार आहेत. अधिक माहितीसाठी राजेंद्र खाडये ९८७००५२२८२, चंद्रकांत खाडये -९८९२०७८४०१ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन वैश्य ग्लोबल बिझनेस ग्रुपचे डॉ. संतोष कामेरकर यांनी केले आहे.