You are currently viewing मठ नं १ शाळेत कविता मार्गदर्शन वर्गाचे आयोजन

मठ नं १ शाळेत कविता मार्गदर्शन वर्गाचे आयोजन

*मठ नं १ शाळेत कविता मार्गदर्शन वर्गाचे आयोजन*

कै.रायसाहेब डॉ.रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ नं १ येथे आम्ही बालकवी सिंधुदुर्ग मार्फत कविता मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले.
शाळेत दहा दिवस दप्तरवीना शाळा हा आनंदादायी शनिवार अंतर्गत या कविता मार्गदर्शन वर्गाचे आयोजित मठ नं १ शाळेत करण्यात आले. या मार्गदर्शन वर्गात कविवर्य राजेंद्र गोसावी यांनी आपल्या अनोख्याशैलीतून शाळेतील विद्यार्थ्यांना कविता लेखनबाबत मार्गदर्शन केले.
या मार्गदर्शन वर्गातील विविध कृतीमुळे विद्यार्थी नकळत कविता लिहू लागले. मार्गदर्शन वर्गातील छोट्या छोट्या स्पर्धामुळे विद्यार्थ्यांमध्ये कविता लेखनाची आवड निर्माण झाली. मार्गदर्शन वर्गाच्या शेवटी आम्ही बालकवी सिंधुदुर्ग तर्फे घेतलेल्या स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षिसे तसेच प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष तेंडोलकर, केंद्रमुख्याध्यापक अजित तांबे, प्रतिमा साटेलकर, पांडुरंग चिंदरकर, गणेश नाईक, अवनी मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पांडुरंग चिंदरकर व आभार प्रतिमा साटेलकर यांनी मानले. कविवर्य राजेंद्र गोसावी यांचे शाळेच्या वतीने आभार मानन्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा