You are currently viewing मच्छिमार संस्था व बांधवांना योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

मच्छिमार संस्था व बांधवांना योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी 

 जिल्ह्यात मत्स्यव्यवसाय विभागामार्फत जिल्हा वार्षिक योजना या योजनेअंतर्गत योजना राबविण्यात येतात. या योजनांचा मच्छिमार संस्था व बाधवांनी लाभ घ्यावा.

            सदर योजनांची माहिती पुढील प्रमाणे आहे. लहान मच्छिमार बंदरांचा विकास, या योजनेअंतर्गत मच्छिमारांच्या सोयी सुविधांसाठी मासळी उतरविण्याच्या केंद्रांवर, बंदरावर पाकटी, जोडरस्ता, उघडा निवारा, जेट्टी, गाईड पोस्ट, पाणी पुरवठा, विद्युत पुरवठा ही कामे करण्यात येतात. मच्छिमार सहकारी संस्थांना वीज दरात सवलत – या योजनेअंतर्गत मच्छिमार सहकारी संस्थांच्या बर्फ कारखानाच्या प्रती वीज युनिट्सवर 40 पैसे अनुदान देण्यात येते. तसेच मच्छिमार साधने, मासेमारी साधनांवर अर्थसहाय्य – या योजनेमध्ये मच्छिमार साधने बिगर यांत्रिकी नौका अनुदानमध्ये बिगर यांत्रिकी नौका बांधणी करण्यासाठी 50 टक्के अनुदान देण्यात येते. तर सुत व तयारप जाळ्यावरील अनुदानमध्ये 3 मेट्रीक टनावरील प्रत्येक नौकेस प्रत्येक वर्षी 100 किलोग्राम पर्यंत व 3 टना खालील प्रत्येक नौकेस प्रतीवर्षी 50 किलोग्राम पर्यंत अनुदान देण्यात येते. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, मालवण, सिंधुदुर्ग येथए दूरध्वनी क्र. 02365-252007 या क्रमांकावर संपर्क साधावा.

            तरी सदर योजनांचा लाभ जास्तीत जास्त मच्छिमार बांधवांनी घ्यावा असे आवाहन ना.वि. भादुले, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − 9 =