सायबर फसवणूक टाळण्यासाठी सतर्क राहा !
पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांचे आवाहन
▪️पोलीस प्रशासन सदैव ग्रामस्थांसोबत
▪️मसूरे येथे ग्रामसंवाद उपक्रमास प्रतिसाद
मालवण
मोबाईलवर येणाऱ्या अनोळख्या लिंक्स किंवा फेक संदेश यांचा आपण वापर टाळणे आवश्यक आहे. सायबर फसवणूक समाजात वाढत आहे. यासाठी सर्वांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. आपल्याला कोणतीही शंका आल्यास नजीकचे पोलीस स्टेशन, पोलीस पाटील यांना त्वरित संपर्क साधावा. पोलीस प्रशासन सर्व ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल असे प्रतिपादन मालवण पोलीस निरीक्षक श्री प्रवीण कोल्हे यांनी मसूरे येथे केले.
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या आदेशाने मालवण पोलीस निरीक्षक श्री प्रवीण कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली मर्डे ग्रामपंचायत सभागृहात मसुरे गावातील ग्रामस्थांसाठी ग्रामसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी सायबर गुन्हे कसे घडले जातात, यातून कोणती काळजी घेणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे विविध प्रकारचे गुन्हे घडू नयेत तसेच महिलांनी जेष्ठ नागरिकांनी युवकांनी कोणकोणती काळजी घेणे गरजेचे आहे याबाबत सर्वांना मार्गदर्शन केले. गावातील मंदिरे घडताना गावातील शालेय गरजा यामध्ये विविध सुविधा निर्माण होण्यासाठी सुद्धा ग्रामस्थांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मतही व्यक्त केले. ज्येष्ठ नागरिकांच्या संघटना निर्माण करून ज्येष्ठांच्या समस्या सोडविणे सुद्धा गरजेचे आहे. समाजात आज खोटी आश्वासने, अनेक प्रलोभने दाखवून ग्रामस्थांना फसविण्याचे प्रकार सुरू आहेत परंतु अशा सर्व प्रकारातून प्रत्येकाने सावध होऊन अशा कोणत्याही आमिषाला भुलू नका असे आवाहन मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी यावेळी केले. यावेळी डॉ. सुधीर मेहेंदळे यांनी समाजात आज विविध कार्यक्रमांमध्ये ध्वनी प्रक्षेपक यांचा आवाज मोठ्या प्रमाणात असतो. याबाबत उपयोजना होणे गरजेचे असल्याचे मत मांडले. स्टेट बँक ऑफ इंडियाचे मसुरे शाखाधिकारी मयूर खेडेकर यांनी आपल्या बँक अकाउंटचे किंवा आपल्या पैशांची काळजी घ्यावी, कमी दिवसात पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाला न भुलणे, बँकेमधून बोलत असून तुमचा आधार नंबर किंवा ओटीपी जर कोणी मागत असेल तर याची खात्री स्वतः बँकेत येऊन करणे गरजेचे आहे. अशा फेक कॉल वर कोणीही विश्वास ठेवू नये आणि विविध बँकेच्या योजनांची माहिती यावेळी उपस्थिताना दिली. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.लोमटे यांनी आरोग्य विषयक माहिती देऊन नवीन निर्माण झालेल्या व्हायरस बाबत कोणती काळजी घेतली पाहिजे यावेळी मार्गदर्शन केले.
मसुरे केंद्र शाळा येथील शिक्षक श्री विनोद सातार्डेकर यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी शाळा शाळांमध्ये तसेच महत्त्वाच्या रस्त्यांवरती सीसीटीव्ही लावणे आवश्यक असल्याचे मत मांडले. माजी जी प अध्यक्ष सरोज परब, माजी सरपंच संदीप हडकर, निवृत्त पोलिस अधिकारी राजन परब, रामराज सावंत आदी ग्रामस्थांनी अनेक समस्या बाबत चर्चा विनिमय केला. यामध्ये प्रामुख्याने आरोग्य, बँक,सायबर गुन्हेगारी,शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षा, जमिनीतील वाद,व्यापारातील सुरक्षा अशा विविध क्षेत्रातील समस्यांबाबत लक्ष वेधण्यात आले. या वेळी सौ. सरोज परब, डॉ. लोमटे, माजी सरपंच संदीप हडकर, माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, विलास मेस्त्री, डॉ सुधीर मेहंदळे, डॉ विश्वास साठे, राजन परब,मसुरे पोलीस श्री.विवेक फरादे, मुख्याध्यापिका सौ अर्चना कोदे, जगदीश चव्हाण, कृष्णा पाटील,विनोद सातार्डेकर , भरतगड इंग्लिश मिडीयमच्या मुख्याध्यापिका संतोषी मांजरेकर, पोलिस पाटील सुरेखा गावकर, प्राजक्ता पेडणेकर, ऐशाबी सय्यद ,प्रेरणा येसजी, अभिजित दुखंडे, साईप्रसाद बागवे, शशांक ठाकूर, नेवेश फर्नांडीस, सोमा ठाकूर,सोनल भोगले, मसुरे ग्रामविकास अधिकारी शंकर कोळसुलकर, सेवानिवृत तलाठी श्री धनंजय सावंत, पंढरीनाथ नाचणकर, तात्या हिंदळेकर, राजू मालवणकर, सचिन चव्हाण, पल्लवी नाचणकर, अशोक सांडव, बाबू येसजी, बाळू परब, यासिन सय्यद, नाझिया शेख, सुजाता पेडणेकर, विजय गिरकर, दर्शना खोत, माया मुणगेकर, आणि मसुरे ग्रामस्थ, व्यापारी, वैद्यकीय क्षेत्रातील आशा स्वयंसेविका विविध सहकारी सोसायटीचे सदस्य उपस्थित होते.