चिंचवड :
रामकृष्ण मोरे सभागृहात नुकताच एक जल्लोष पूर्ण तरुणाई चा गीत, संगीत, निवेदन, सादरीकरण, गाण्याची निवड या सर्वच बाबतीत माहोल मनावर छाप पाडून गेला.
गायक पलाश, सौरभ, गणेश, संगीत संयोजन गणेश शीलवंत, तबला, क्लॅपबॉक्स प्रसाद यांनी नव्वदी म्हणजेच १९९०आणि त्याआधीच्या सादर केलेली एकसे एक झलक मनाला मोहवून गेली.
के के, नुसरत फतेह अली खान, यांच्या सुफियाना अंदाज तर आवडला. मधुन मधुन सौरभची शायरी तर अप्रतिम, त्याचे पाठांतर, सादरीकरण भन्नाटच. त्याच्या उर्दु आणि गझल विषयक ज्ञानसाठयाला वाकूनच इर्शाद. गायन वादन आणि शेरोशायरी चे एकूण सादरीकरण छाप पाडून गेले. कसलेल्या निवेदकाच्या भूमिकेत केतकी भावली.
आपण सादर करीत असलेल्या कार्यक्रमाची उत्तम जाण, अभ्यास आणि त्याची रंगत वाढवत नेण्याची तिचे कसब कौतुकास्पदच.
शेवटी माहोलचा कळस झाला कव्वालीच्या धमाल गुफणीतून, असं वाटत होत परदा है पर्दा है च्या ऐवजी अजुन काही वेळ तरी परदा येऊच नये. श्रोते मंत्रमुग्ध अवस्थेत सभागृहाबाहेर पडले. तरूण वृंद आश्वासक आहे.
माधुरी वैद्य कुमठेकर
9890567536