You are currently viewing श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प- ८० वे

श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प- ८० वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी अरुण वी. देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

।। गण गण गणात बोते ।। जय गजानन श्री गजानन ।।

__________________________

श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प- ८० वे

अध्याय – १४ वा कविता – २ री

__________________________

बंदूतात्या शेगावी आला । स्वामी गजाननाच्या दर्शनाला ।

पाहुनी त्याला । स्वामी म्हणती- बंडुतात्या ।।१।।

 

त्रासला तू प्रपंचात । व्यथा या संसारात । या तर सदाच असतात । म्हणून का आत्महत्या करावी ? सांग ।।२।।

 

तू प्रयत्न काही ना करिसी । साध्य ते साधण्याशी ।नुसता हताश होउनी बैससी ।अशाने काही नसे होत रे ।।३।।

 

तू जीव देऊ नको । निराश होऊ नको । संसारा, मुला-बाळा सोडू नको । जा तू परत ईथुनी ।। ४ ।।

 

स्वामींनी परत पाठवले त्याला । सांगितले त्याला।

शेतात जा ,शोध,द्रव्य सापडेल तुला । स्वामी बोलले तैसेचि झाले ।।५।।

 

बंदूतात्याला द्रव्य लाभ झाला । या द्रव्यामुळे तो कर्जमुक्त झाला । स्वामीकृपेचा लाभ झाला । सुखी झाला संसारी ।।६।।

 

सोमवती पर्व आले। स्वामींकडे प्रिय शिष्य आले। दर्शना चला ओंकारेश्वरी म्हणाले । परी नकार देती स्वामी शिष्यांना ।।७।।

_______________________

करी क्रमश: लेखन कवी अरुणदास

___________________________

कवी अरुणदास – अरुण वि. देशपांडे -पुणे

___________________________

प्रतिक्रिया व्यक्त करा