वेंगुर्ले पं. स. चे निवृत्त विस्तार अधिकारी बाबली वायंगणकर राज्यस्तरीय निवृत्ती सेवा पुरस्काराने सन्मानित
वेंगुर्ले
महारष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन तर्फे दर वर्षी दिला जाणारा मानाचा राज्यस्तरीय निवृत्ती सेवा पुरस्कार यावर्षी वेंगुर्ले पंचायत समितीचे निवृत्त विस्तार अधिकारी बाबली रामा वायंगणकर यांना जाहीर झाला होता. या पुरस्काराचे वितरण बारामती येथे असोसिएशन च्या अधिवेशनात अध्यक्ष एम डी मारणे यांच्या हस्ते श्री. वायंगणकर यांना प्रदान करून गौरविण्यात आले.
बारामती येथे पद्मश्री आप्पासाहेब पवार सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात अध्यक्ष एम डी मारणे यांच्या सह कोषाध्यक्ष श्रीमती अपर्णा कुलकर्णी, कार्याध्यक्ष वसंतराव वाबळे, सरचिटणीस लक्ष्मण टेंबे आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
शासकीय सेवेतून निवृत्त होऊनही श्री. वायंगणकर आपला वेळ सेवा स्वरूपाने संघटनेच्या कार्यासाठी देत असतात. त्यांच्या या कामाचा आदर्श अन्य सेवा निवृत्त यांनाही मिळत आहे. या कार्याची दखल घेऊन असोसिएशन तर्फे हा पुरस्कार देण्यात आला आहे. यावेळी श्री वायंगणकर यांच्यासोबत संघटनेचे पदाधिकारी जिल्हा अध्यक्ष आंबेकर, सदस्य एस. एल. कोरगावकर आदी उपस्थित होते.