*मुलांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाची भूमिका फार मोलाची*
बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे उपक्रम खरोखरच स्तुत्य आणि गौरवास्पद; जिल्हाधिकारी यांचे उद्गार
कुडाळ :
“शालेय जीवनाचा काळ व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत महत्त्वाचा असतो. विद्यार्थ्यांचा अभ्यास करून घ्या, योग्य ज्ञान द्या; पण त्याचबरोबर जीवन शिक्षणही द्या. अध्ययन- अध्यापनाची भाषा बदलली तरी जीवनमूल्ये, संस्कृती बदलू देऊ नका.”, असे उद्गार सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी काढले. ते बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूलच्या स्मृतिगंध या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करताना बोलत होते. त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये “ज्ञान मिळवायचच; पण त्याबरोबर आपल्यातील कलेला न्याय दिला पाहिजे. पालकांनी आपल्याला काय आवडते यापेक्षा मुलांची आवड कशात आहे त्याचा शोध घेऊन मुलांना काय व्हायचं आहे ते बघितले पाहिजे. तर त्याचं धेय्य ते साध्य करू शकतात. विद्यार्थ्याला मनाच्या तंदुरुस्ती बरोबर शरीराच्या तंदुरुस्तीसाठी खेळ खेळायची सवय लावा. खेळामुळे हार- जीत पचवायची ताकद येते. आत्मविश्वास वाढतो. असे सांगून जीवनात तीन आरचा वापर करा रीड, रीराईट आणि रीवाइज. जेणेकरून आपले ज्ञान पक्के होईल. असे सांगून मुलांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम फार मोलाची भूमिका बजावत असतात आणि याकडे बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन व त्यांचे शिक्षक, सहकारी जे उपक्रम राबवीत आहेत ते खरोखरच स्तुत्य आणि गौरवस्पद आहेत. असे सांगून संस्थेच्या आणि विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत व्यासपीठावर कुडाळ चे तहसीलदार वीरसिंग वसावे, संस्था चेअरमन उमेश गाळवणकर, सीईओ अमृता गाळवणकर, डॉ. जी.टी. राणे उभयत, व पालक प्रतिनिधी विठ्ठल सावंत, फिजीओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरज शुक्ला ,कला, वाणिज्य आणि विज्ञान महिला व रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मर्गज, बॅ. नाथ पै बी.एड. महाविद्यालयाचे प्राचार्य परेश धावडे, अविनाश वालावलकर, सेंट्रल स्कूलच्या प्राचार्य चैताली बांदेकर, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य कल्पना भंडारी, इत्यादी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले .व्यासपीठावर उपस्थित असणारे डॉ.जी.टी राणे यांनी स्नेहसंमेलनास शुभेच्छा देताना “हे स्नेहसंमेलन हे नुसते संमेलन नव्हे तर लहान मुलांच्या आठवणीचा खजाना आहे. शाळा ही ज्ञान देणारी नुसती जागाच नाहीये ;तर व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करणारे एक केंद्र आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना शाळेतूनच प्रोत्साहन दिले गेले पाहिजे .जेणेकरून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढू शकेल. बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाचे व्यासपीठ हा एक छोटा प्रोग्रॅम ठरत नाही; तर व्यावसायिक कलात्मकतेच इथे फिलिंग जाणवत राहतं.” असं सांगून स्नेहसंमेलनात सहभागी विद्यार्थी कलाकारांना शुभेच्छा दिल्या .
तहसीलदार विरसिंग वसावे यांनी आपल्या जीवनात कलाही फार महत्त्वाची आहे. आपल्यातील कला गुण जिवंत ठेवा .कलेसोबत जगा जेणेकरून जीवनाला रंगत प्राप्त होईल. असे सांगून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
अविनाश वालावलकर यांनी आपल्या मनोगत यामध्ये “विविध उपक्रम राबवून सातत्याने काहीतरी नवीन करणारी संस्था. सर्व सेवाभावी संस्थांना नेहमी मदत करण्यास तयार असणारी संस्था. असं कौतुक करून उमेश गाळवणकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले.
डॉ. दिपाली काजरेकर यांनी सुद्धा “बॅ.नाथ पै शिक्षणही केवळ संस्था नसून जीवनाचे भव्य व्यासपीठ आहे. ती विद्यार्थ्यांना विशाल अनुभव देण्याचे काम करत आहे. व तिची सतत भरभराट होवो . अशा शुभेच्छा व्यक्त केल्या.
उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते गणित ओलंपियाड व त्रिकोंमिती ऑलिंपिक व वेतोबा मालिकेत काम केलेल्या साहिल सातार्डेकर. याचाही तसेच या स्पर्धांमध्ये नेत्रदीपक यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा जिल्हा अधिकारी यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांचे शाल श्रीफळ, पुष्प रोप व शिवराय राजमुद्रा देऊन सत्कार करण्यात आला. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदार जोशी यांनी केले. तर सांस्कृतिक कार्यक्रमाची सूत्रसंचालन चित्रा कुंटे व विश्वजीत डांगमोडेकर व सहकारी यांनी केले.त्यानंतर बाल कलाकारानी विविध वैयक्तिक व समूहनृत्य असा बहारदार कार्यक्रम सादर करून स्नेहसंमेलनाची लज्जत वाढवली.