मंदार शिरसाठ यांच्या संकल्पनेतून कुडाळ शहर मच्छर मुक्त करण्यासाठी आश्वासक पाऊल
कुडाळ
कुडाळ नगरपंचायत स्वच्छता सभापती मंदार शिरसाठ यांच्या संकल्पनेतून व कुडाळ नगरपालिका यांच्या माध्यमातून मच्छर मुक्त कुडाळ करण्यासाठी आश्वासक पाऊल उचलले गेले आहे.
कुडाळ शहर मध्ये वाढलेले मच्छरचे प्रमाण लक्षात घेता काही दिवसांपूर्वी कुडाळ नगरपंचायत स्वच्छता सभापती यांनी कुडाळ शहरांमध्ये गप्पी मासे सोडण्याची संकल्पना मांडली होती व त्याची सुरुवात आज तूप्पटवाडी येथील ओहोळ व रेल्वे स्टेशन येथील ओहोळ येथे गप्पे मासे सोडून करण्यात आली
त्याच प्रकारे त टाकाऊतून टिकाऊ वस्तू घेऊन कुडाळ नगरपालिकेचा कोणताही एक रुपया खर्च न घालता गप्पी मासे पैदास केंद्र देखील अनंत मुक्ताई केंद्र येथे चालू करण्यात आले सदर ठिकाणी गप्पी मासे पैदास करण्यासाठी प्राथमिक 200 मासे सोडण्यात आले असून येणाऱ्या काळात पैदास केंद्रात माशांची संख्या वाढवून यावर्षी कुडाळ शहरांमध्ये चाळीस हजार गप्पी मासे सोडण्याचे नियोजन देखील करण्यात येणार आहे येणाऱ्या महिन्यांमध्ये नागरिकांच्या मागणीनुसार त्यांना मोफत स्वरूपामध्ये गप्पी मासे या केंद्रातून देण्यात येणार आहेत सदर गप्पी मासे केंद्र उभारण्यासाठी मुलदे कृषी विद्यापीठ व हिवताप विभाग यांचे विशेष सहकार्य लाभले सदर गप्पी मासे केंद्र उभारणीसाठी कुडाळ नगरपंचायत मुख्याधिकारी अरविंद नातू, कुडाळ स्वच्छता निरीक्षक संदीप कोरगावकर, स्वच्छता मुकादम दीपक कदम, मुनगेकर तसेच सर्व नगरपंचायत कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले या कार्यक्रम प्रसंगी कुडाळ प्रभारी नगराध्यक्ष किरण शिंदे, कुडाळ माजी नगराध्यक्ष अक्षता खटावकर, अफ्रीन करोल, सई काळप,ज्योती जळवी, भाजप गटनेता विलास कुडाळकर, स्वच्छता निरीक्षक संदीप कोरगावकर, दीपक कदम उपस्थित होते अशी माहिती कुडाळ स्वच्छता सभापती मंदार श्रीकृष्ण शिरसाठ यांनी दिली.