स्वामी विवेकानंद यांचा जयंती दिनानिर्मित‘राष्ट्रीय युवा दिन’ साजरा करण्यात येणार
सिंधुदुर्गनगरी
पद्मश्री रमाकांत आचरेकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ओरोस, येथे रविवार दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी स्वामी विवेकानंद यांचा जयंती दिनस ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने दिली आहे.
जिल्हयातील युवकांच्या विविध गुणांना तसेच कौशल्यांना वाव मिळावा व प्रोत्साहन मिळावे यासाठी या संस्थेतून व्यवसाय अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या व यशस्वी उद्योजक म्हणून नावरुपास आलेल्या माजी प्रशिक्षणार्थ्यांचा मान्यवरांच्याहस्ते प्रथम गौरव करण्यात येणार आहे. यशस्वी उद्योजकांच्या माध्यमातून संस्थेतील आजी व माजी प्रशिक्षणार्थी यांना स्वयंरोजगार आणि नेतृत्व विकास याबाबतचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याप्रमाणे सन २०२४-२५ मधील संस्थेतील क्रीडास्पर्धा, तंत्रप्रदर्शन, वक्तृत्वस्पर्धा, रांगोळी स्पर्धा यामध्ये प्राविण्य मिळविलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय युवा दिनाच्या या कार्यक्रमांसाठी संस्थेतील आजी व माजी प्रशिक्षणार्थी तसेच त्यांच्या पालकांना या कार्यक्रमास सकाळी १०:०० वाजता उपस्थित रहाण्याचे आवाहन संस्थेचे प्राचार्य एस. एस. मोहारे यांनी केले आहे.