कुडाळ :
गेल्या अनेक वर्षाची मागणी असलेल्या कुडाळ तालुक्यातील पावशी बोरभाटवाडी सर्व्हिस रस्ता कामाचा आज मा. आमदार श्री. निलेश राणे यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला. याठिकाणी जोडरस्ता नसल्याने इथे अनेक अपघात झाले या रस्त्यासाठी पावशी ग्रामस्थांनी अनेक वर्षे संघर्ष केला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पावशी सरपंच सौ. वैशाली पावसकर यांनी याच सर्व्हिस रस्त्याच्या मुद्यावरून उबाठा गटाला रामराम करून भाजपा पक्षात प्रवेश केला होता. त्या नंतर श्री. निलेश राणे यांनी पावशी येथे येऊन या रस्त्याच्या कामाचा शब्द दिला होता.
आज या रस्त्याच्या कामाची रीतसर निविदा करून कार्यारंभ आदेश निघाल्यानंतर आमदार श्री. निलेश राणे यांच्या हस्ते या सर्व्हिस रस्त्याच्या कामाचा शुभारंभ सोहळा पार पडला.
यावेळी शिवसेना उपनेते श्री. संजय आंग्रे, पावशी सरपंच वैशाली पावसकर, दादा साईल, पप्या तवटे, वृनाल कुंभार, रमेश कुंभार, प्रकाश पावसकर आदी उपस्थित होते.