अमेय आपटेचा प्रथम क्रमांक तर कर्तव्य बांदिवडेकरचा द्वितीय क्रमांक
सावंतवाडी :
५ वी ते ९ वी तील एसएससी बोर्डच्या मराठी, इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमातील शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक विषयांची तयारी आणि व्यक्तिमत्व विकासासाठी असलेले उपयुक्त अंगभूत गुण तपासण्यासाठी *एमकेसीएल ऑलिंपियाड मुव्हमेंट स्पर्धा-परीक्षा २०२४* अर्थात *‘MOM’* ही जिल्हास्तरीय स्पर्धा घेण्यात आली होती.
सदर परीक्षेसाठी राज्यभरातून ३०००० विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत सावंतवाडीमधील *सरकारमान्य एमएससीआयटी केंद्र आनंदी कॉम्प्यूटर्स यांच्या विद्यमाने आरपीडी प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या परीक्षेत आरपीडी प्रशालेचा इ.८ वी चा विद्यार्थी कु.अमेय आपटे याने जिल्हास्तरिय प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्याबद्दल शैक्षणिक साहित्य, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
यासोबतच आरपीडी प्रशालेचा इ.७ वी चा विद्यार्थी कु. कर्तव्य तेजस बांदिवडेकर याने जिल्हास्तरिय द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. त्याबद्दल शैक्षणिक साहित्य, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
या दूहेरी यशस्वितेसाठी व आरपीडी प्रशालेचे नावलौकिक मिळवून दिल्याबद्दल अमेय व कर्तव्य याचे तसेच मार्गदर्शक शिक्षक – पालकवर्ग या सर्वांचे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष श्री.विकासभाई सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव श्री. व्ही. बी. नाईक, खजिनदार श्री. सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष श्री. अमोल सावंत व सर्व संस्था सदस्य तसेच मुख्याध्यापक श्री. जे. व्ही. धोंड, प्र.मुख्याध्यापक श्रीम. संप्रवी कशाळीकर, पर्यवेक्षक श्री. एस. एन पाटील, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक, तसेच आनंदी कॉप्युटर्सचे संचालक श्री. मेघश्याम काजरेकर, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, पालक- शिक्षकसंघ पालकवर्ग यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.