You are currently viewing व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी, माडखोलमध्ये रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी, माडखोलमध्ये रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी, माडखोलमध्ये रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद*

सावंतवाडी

जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही रक्तदान महायज्ञाचे आयोजन केले त्या निमित्ताने दिनांक 7/1/2025 रोजी सकाळी ठिक 10 वाजता व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी माडखोल येथे
रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.माणसाशी रक्ताचे नाते जोडणारे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान समजले जाते. रक्ताचा तुटवडा वारंवार भासत असतो त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्याना रक्त बाटल्या पुरवण्याचे काम जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांच्या वतीने केले जाते.
महाविद्यालयाने रक्तदान शिबिराचे आयोजन करून समाजासाठी आपले योगदान दिले आहे. रक्तदान शिबिरात महाविद्यालयाचे प्राध्यापक , कर्मचारी व विद्यार्थी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्स्पूर्त प्रतिसाद नोंदविला. कार्यक्रमाचे उद्घाटन माडखोल गावचे विद्यमान सरपंच सौ श्रृष्णवी सुयोग राऊळ यांच्या हस्ते झाले यावेळी व्यासपीठावर माजी सरपंच बाळु शिरसाट,वीज ग्राहक संघटना तालुकाध्यक्ष संजय भिकाजी लाड, ग्रामपंचायत सदस्य विजय राऊळ, भाउ कोळमेकर, अनिता अनिल राऊळ, सरिता राऊळ, जानवी पाटील, महाविद्यालयाचे प्रशासकिय अधिकारी श्री पंकज पाटील प्राचार्य डॉ सुनील शिंगाडे, विभाग प्रमुख डॉ संदेश सोमनाचे , माजी तंटामुक्ती अध्यक्ष श्री विजय राऊळ,स्वस्वरुप सांप्रदायाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष श्री राजेश पेडणेकर आणि ईतर पदाधिकारी उपस्थित होते यावेळी एस एस पी एम मेडिकल कॉलेज आणि लाईफ टाईम हॉस्पिटल चे डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी माडखोल,कारिवडे,चराठा , आंबेगाव,पारपोली सेवा केंद्रातील भक्त गणांनी मेहनत घेतली

प्रतिक्रिया व्यक्त करा