सिंधुदुर्ग :
रत्नागिरी येथे झालेल्या २०२५ मधील पहिल्याच कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन मध्ये सिंधू रनर्स टीमने सहभाग नोंदवून २०२५ वर्षाची दमदार सुरुवात केली. सुवर्णसुर्य फाउंडेशन आणि महाराष्ट्र टुरिझम यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी येथे होणाऱ्या कोकण कोस्टल मॅरेथॉन मध्ये यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधू रनर्स टीम मधून ३५ धावांनी सहभाग नोंदवला. ही मॅरेथॉन २१ किलोमीटर १० किलोमीटर आणि पाच किलोमीटर या अंतरांच्या प्रभागात घेतली जाते. रत्नागिरीतील थिबा सेंटर इथून सुरू होऊन पुढे नाचणे, टेंभवाडी, कोळंबे आणि फणसोप करत भाटे समुद्रकिनाऱ्यावर या मॅरेथॉनची सांगत होते. या मॅरेथॉनचा रोड अतिशय निसर्गरम्य आणि चढउताराने भरलेल्या रत्नागिरीतील छोट्या छोट्या आठ गावांमधून जातो. मॅरेथॉन पळताना वाटेत सभोवताली असलेली आंब्याची वनराई, काही अंतरावरून दिसणारी नदी, आणि समुद्रकिनाऱ्याला भेटणारी खाडी अशी मनमोहक दृश्य पहावयास मिळतात.
यावर्षी या मॅरेथॉनचे दुसरे वर्ष होते गतवर्षीप्रमाणे यावर्षीही सिंधू रनर्स टीम कडून ३५ धावपटू विविध धाव प्रकारात सहभागी झाले होते. २१ किलोमीटर अंतरासाठी २२ धावपटू, दहा किलोमीटर अंतरासाठी ११ धावपटू आणि पाच किलोमीटर अंतरासाठी तीन धावपटूंनी सहभाग नोंदवला. सहभागी धावपटूंची नावे पुढीलप्रमाणे आहेत. (महादेव बांदेलकर, ओंकार पराडकर, डॉ. स्नेहल गोवेकर, विनायक पाटील, अजित पाटील, लक्ष्मण साळगावकर, डॉ. रवी गोलगाटे, डॉ. सचिन पुराणिक, डॉ. प्रफुल्ल आंबेडकर, डॉ. अनघा बोर्डवेकर, डॉ. मिलिंद बोर्डवेकर, धीरज पिसाळ, अद्वैत प्रभूदेसाई, सुजाता रासकर, प्रसाद बांदेकर, प्रेरणा लोहार, डॉ. गिरीश बोर्डवेकर, जागृती नांदोस्कर, शिवानी तूयेकर, सतीश दीपनाईक, नम्रता कोकरे, रोहित कोरगावकर, जागृती बांदेलकर, ओंकार बोर्डवेकर, मायरन फर्नांडिस, अनिल बडे, समीक्षा बांदेलकर, सुमेधा आरोलकर, रवी बुरुड, सहज बुरुड, मयुष फर्नांडिस, कृतिका लोहार).
मॅरेथॉन संपल्यावर प्रत्येक धावपटूला आंब्याच्या स्वरूपातील पदक प्रदान करण्यात आले. या मॅरेथॉनची खासियत म्हणजे वर्षाच्या सुरुवातीलाच पहिल्या रविवारीच ही मॅरेथॉन भरवली जाते. यामध्ये रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश धावपटू सहभागी होतात. या मॅरेथॉनचा मार्ग चढउताराचा आणि धावपटूंचा सराव आणि जिद्द तपासून पाहणार आहे. २१ किलोमीटर अंतर पळताना धावपटूला २३० मीटर पर्यंत उंची गाठावी लागते. त्यामुळे या मॅरेथॉन मध्ये धावपटूंचा कस लागतो. सिंधू रनर्स टीम कडून तब्बल पाच खेळाडूंनी २१ किलोमीटर अंतर दोन तासाच्या आत पार केले आणि तीन खेळाडूंनी दहा किलोमीटर अंतर एका तासाच्या आत पार केले. टीम कडून पहिल्यांदाच छोट्या धावकांनी पाच किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत सहभाग नोंदवून पाच किलोमीटर अंतर तीस मिनिटाच्या आत पार करण्यात यश प्राप्त केले.
या कामगिरीबद्दल सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे आणि युवाराज्ञी सौ. श्रद्धाराजे भोसले, भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय सावंतवाडी, डॉक्टर्स फॅटनेटी क्लब सिंधुदुर्ग तसेच जिल्ह्यातील सर्व स्तरावरून सिंधू रनर्स टीम आणि सहभागी धावकांचे कौतुक होत आहे. यापुढेही अशीच कामगिरी सिंधू रनर्स टीम बजावत राहील.
धावणे या व्ययाम प्रकारा बद्दल जनसामान्यात जागृती करून आपल्या जिल्यात व राज्यात देशाचे नेतृत्व करणारे धावपटू तयार करणे हेच या मागचे उद्धिष्ट आहे. सिंधू रनर टीम ने आता पर्यंत सावंतवाडी १२ तास रन ३ वेळेस, गोवा ते सावंतवाडी १०० किलोमीटर रन २ वेळेस, मालवण ते सावंतवाडी आरमार रन ३ वेळेस, २४ तास स्टेडियम रन, हिमालयन खारडुंगला अल्ट्रा रन ७२ किलोमीटर, देहू ते पंढरपूर २६६ किलोमीटर, टाटा अल्ट्रा मॅरेथॉन, पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन, पुणे अल्ट्रा मॅरेथॉन, जम्पिंग गोरिला ट्रेल रन, लोकमत मॅरेथॉन, ठाणे हाफ मॅरेथॉन, टाटा मुंबई मॅरेथॉन, वसई विरार मॅरेथॉन, अदानी अहेमदाबाद मॅरेथॉन, गोवा रिव्हर मॅरेथॉन, कोकण कोस्टल मॅरेथॉन, जगप्रसिद्ध कॉम्रेड मॅरेथॉन २०२४ अश्या आणि अनेक रन मध्ये भाग घेऊन आपल्या जिल्याह्याचे नाव जगभरात गाजवले आहे.