You are currently viewing राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह निमित्त बबली राणे यांचा पोलीस अधिक्षकांकडून सत्कार

राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह निमित्त बबली राणे यांचा पोलीस अधिक्षकांकडून सत्कार

राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह निमित्त बबली राणे यांचा पोलीस अधिक्षकांकडून सत्कार

मंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत करण्यात आला विशेष सत्कार

कणकवली

राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह उदघाटन प्रसंगी नॅशनल हायवेवरील अपघातग्रस्ताना तातडीने मदतकार्य करणाऱ्या चंद्रहास उर्फ बबली राणे यांचा विशेष सत्कार मत्सोद्योग मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपप्रदेशिक परिवहन अधिकारी काळे आदी उपस्थित होते. बबली राणे हे मागील 25 वर्षे मुंबई गोवा महामार्गावर रात्री अपरात्री अथवा दिवसा झालेल्या अपघात प्रसंगी जखमींना नि:स्वार्थी बुद्धी ने मदतकार्य करतात. प्रसंगी पोलीस यंत्रणेलाही आवश्यक सहकार्य करतात. बबली राणे यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना विशेष सन्मानित करण्यात आले.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा