सौ. सुवर्णा नंदकुमार प्रभूदेसाई यांच्या ‘सुवर्णरेखा’ रांगोळी पुस्तकाचा अनावरण सोहळा संपन्न
सावंतवाडी
बॅन्क ऑफ इंडीया च्या निवृत्त अधिकारी सौ. सुवर्णा नंदकुमार प्रभूदेसाई यांच्या ‘सुवर्णरेखा’ या रांगोळी पुस्तकाचा अनावरण सोहळा रविवार दिनांक ५ जानेवारी रोजी धनश्री मंगल कार्यालय, सावंतवाडी येथे पार पडला. ‘सुवर्णरेखा’ या पुस्तकाचा अनावरण सोहळा स्नेह नागरी पतसंस्था सावंतवाडी चे चेअरमन मा. श्री. अनंत व्यंकटेश उचगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली व श्री. नंदकुमार प्रभूदेसाई बॅन्क ऑफ इंडीया निवृत्त अधिकारी, सौ. सुवर्णा प्रभूदेसाई, मा. प्रा. सुभाष गोवेकर सर, श्री. शैलेश पई, अध्यक्ष कळसुलकर इंग्लिश स्कुल, मा. श्री. मुकेश मेश्राम बॅन्क ऑफइंडीया लिड डिस्ट्रिक्ट मनेजर, रोटेरीअन आबा कशाळीकर, श्री. रवी प्रभूदेसाई, श्री. किरण सिद्ध्ये, श्री. रमेश ललीत, श्रीम. तेंडोलकर, श्रीम. आरती कार्लेकर, सौ. रासम तसेच या पुस्तक प्रकाशनाचे संकल्पक दै. सकाळ प्रतिनीधी श्री. अजय सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न
झाला.
या कार्यक्रमाच्या निमीत्ताने संगीत विषारद कु. विधीता वैभव केंकरे हीच्या सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. या विशेष कार्यक्रमासाठी हार्मोनिअम वर श्री. निलेश मेस्त्री, तबलावादक निरज भोसले यांची साथ लाभली. संजय कात्रे यांनी सुंदररित्या निवेदन केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. अनंत उचगांवकर यांनी कु. विधिता वैभव केंकरे हीच्या उत्तम गायनाबद्दल रोख रक्कम व पुष्पगुच्छ देऊन तीचा सत्कार केला.
मॉर्निंग बॅडमिंटन क्लब सावंतवाडीचे सर्व सदस्य, बॅन्क ऑफ इंडीयाच्या विविध शाखेतील स्टाफ मेंबरर्स, निवृत्त अधिकारी व कर्मचारी, प्रभुदेसाई कुटुंबिय, आप्तस्वकीय, हितचिंतक मित्रपरिवार, तारांगण पार्कमधील रहीवासी मित्र, डॉ. कश्यप देशपांडे, डॉ. संजय दळवी, डॉ. प्रसाद कोकाटे आदी उपस्थित होते. सर्व उपस्थित होते.
मंडळींनी मा. सौ. सुवर्णा प्रभूदेसाई यांना शुभेच्छा दिल्या.