You are currently viewing आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल पुणे, बुलढाणा जिल्ह्यातील कवी निमंत्रित

आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल पुणे, बुलढाणा जिल्ह्यातील कवी निमंत्रित

*शिवनेरीवर शिवाजी महाराजांना मानवंदना*..!

चिखली (६जाने.) जगातील पहिले आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल भिडेवाडा पुणे साठी बुलढाणा जिल्ह्यातून कवींना निमंत्रित करण्यात आले होते यामध्ये प्राचार्य डॉ. पंढरीनाथ शेळके, डॉ. निवृत्ती जाधव ,शाहीर मनोहर पवार, पत्रकार विठ्ठल परिहार, डॉ. मंजुराजे जाधव सिंधखेडकर, व संजय हिवाळे इत्यादि निमंत्रित होते.

.दिनांक १जानेवारी २०२५ रोजी मातृतीर्थ बुलढाणा येथून राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांना वंदन करून .दिनांक ०२ जानेवारी रोजी जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांना वंदन करून ,भंडारा डोंगर येथे भव्य आणि दिव्य 150 कोटीचे संत तुकाराम महाराज मंदिर उभारणीस भेट दिली. पुढे याप्रसंगी छत्रपती संभाजी नगर येथील ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ. सुभाष बागल हे सोबत होते. नंतर आळंदी येथे संत गजानन महाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचे दर्शन झाले.दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी भिडे वाडा पुणे येथे जाऊन क्रांतीसुर्य सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांना वंदन करून जगातील पहिले आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल मध्ये निमंत्रित कवी म्हणून हजेरी लावली. आणि कांतीसुर्य सावित्रीबाईंच्या जीवनावर काव्य सादर केले.बुलढाणा जिल्ह्यातील कवी साहित्यिक प्राचार्य डॉ. पंढरीनाथ शेळके, कवी डॉ. निवृत्ती जाधव, शाहीर/ कवी मनोहर पवार, पत्रकार विठ्ठल परिहार डॉ.मंजू राजे सिंधखेडकर ही सर्व साहित्यिक मंडळी पुणे येथे येऊन भिडेवाडा येथे क्रांतीसुर्य सावित्रीबाई फुले यांना मानवंदना करून, प्रत्येकानी कविता सादर केल्या. याप्रसंगी दुबई येथील प्रसिद्ध कवी श्री मनोज भारशंकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल मध्ये जगातील सहाशे कवीं/कलावंतानी संमेलनाचा स्वाद घेतला. दिनांक ४ जानेवारी २०२५ रोजी देवाची आळंदी येथे उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर आयोजित राज्यस्तरीय शिव बाल किशोर मराठी साहित्य संमेलन आळंदी देवाची मध्ये सहभाग घेtला, दिनांक ५ जानेवारी २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थान शिवनेरी येथे येऊन छत्रपती शिवाजी महाराज जन्म स्थळाचे दर्शन घेतले, आणि त्यांना मानवंदना करण्यासाठी शाहीर डॉ. निवृत्ती जाधव शाहीर मनोहर पवार आणि सोबत डॉ. पंढरीनाथ शेळके ,व पत्रकार विठ्ठल परिहार यांनी मानवंदना म्हणून पोवाडा व स्फूर्ती गीते शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळ शिवनेरी किल्ल्यावर येथे सादर केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा